बीज

बीज

बीज

सगळी जमीन हडप करून
तुम्ही माझ्या पूर्वजांना दिलीय
जागा बसायला,
तुमच्या खुर्च्यांच्या खाली.

मला माझे आजोबा तेच देऊ शकले
संपत्ती आणि वारशाच्या नावावर
माझ्या वडिलास
आणि त्यांनी हेच सोपवलंय माझ्याकडे.

पण मी व्यक्ती नव्हे बीज आहे
आणि तुमच्या खुर्च्यांच्या अंधारातच
एक दिवस उगवेन,

जिथे माझे पूर्वज बसले
त्याच वावराच्या चिखलात
माझे पाय गाडलेले असतील
पण तुमच्या खुर्च्या तुटत जातील
जस जसा मी वाढत जाईन.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

तुमने सारी जमीन लेकर
मेरे पुरखों को दी 
जगह तुम्हारे कुर्सियों के नीचे
बैठने की। 

मुझे मेरे दादा वही दे पाए 
धन और विरासत के नाम पर मेरे पिता को
और उन्होंने यहीं सौंपा है मुझे। 

पर मैं व्यक्ति नहीं बीज हूं 
और तुम्हारी कुर्सियों के अंधेरे में ही
एक रोज उग आऊंगा,

जहां मेरे पुरखे बैठे 
उसी जमीन के कीचड़ में
मेरे पांव गड़े होंगे
पर तुम्हारी कुर्सियां टूटती जाएंगी
ज्यों ज्यों मैं बढ़ता जाऊंगा।। 

©किताबगंज
Kitabganj

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने