आजकालचे अभंग!
🚩
दाटली मनात
लालसा अफाट
गद्दारीचा घाट
घातलेला
जरी भगव्याशी
सांगती इमान
दिल्लीचे चरण
धरलेले
भीती मनोमन
ईडीच्या धाडीची
ही देशोधडीची
लोकशाही
कमळगोळीचा
वाढता अंमल
गोतास ते काळ
झाले आता
मातोश्रीचे ऋण
विसरून गेले
गुलाम जाहले
थोतांडाचे
सांगती हिंदुत्व
शेंडी-जानव्याचे
प्रबोधनकारांचे
नाव नाही
सत्तासंपत्तीची
भूक होई मोठी
निष्ठा तिथे खोटी
सिद्ध झाली
अयोध्येचा राम
कशास हवा बा?
खंडोबा विठोबा
असताना
मतांसाठी किती
व्हावी फरफट
मराठा कस्पट
ठरे आता
मराठी बाण्याचीच
खरी शिवसेना
बाकीची वल्गना
पुरे झाली
लोकशाही ठरे
थट्टेचा विषय
फॅसिस्टांचा जय
होऊ पाहे
आणती उसणे
व्याघ्र अवसान
पण कारस्थान
बोक्यांचेच !
🚩
- भरत यादव
Bharat Yadav