आजोबा तुला लेक म्हणतात
मामा म्हणतात बहिण
बाबा म्हणत असतात सौभाग्यवती
मी म्हणते आई
आई, तुझं नाव काय गं?
मी शाळेत गेले
विद्यापीठात गेले
तुझ्या नावाची गरज नाही पडली
मी अनेकांना आपला परिचय दिला
कुणीही नाही विचारलं
तुझं नाव
मी सज्ञान झाले
मला मतदानाचा हक्क मिळाला
माझ्या मतदान ओळखपत्रात
तुझे नाव नाही आले
मी नागरीक बनले
बाबांच्याच नावाने
मी नोकरदार झाले
बाबांच्याच नावाने
मी बिननावाच्या आईची लेक
सांग आई,
तुझं नाव काय आहे?
कुणी न विचारलेले
कुणी न सांगितलेले
तुझं नाव
मी सर्वांना
सांगू इच्छिते
तुझं नाव
तसे तर धरणीलाही
आई म्हणतात
पण मला तुझेच नाव हवे आहे!
बोल आई,
तुझं नाव काय गं?
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
हिंदी अनुवाद
माँ तुम्हारा नाम क्या है?
नाना तुम्हें बेटी कहते हैं
मामा कहते हैं बहन
बाबा कहते हैं श्रीमती
मैं कहती हूँ माँ
माँ तुम्हारा नाम क्या है
मैं स्कूल गयी
यूनिवर्सिटी गयी
तुम्हारे नाम की
ज़रूरत नहीं पड़ी
मैंने बहुतों को
अपना परिचय दिया
किसी ने नहीं पूछा
तुम्हारा नाम
मैं बालिग हुई
मुझे वोट का हक़ मिला
मेरी वोटर आई डी में
तुम्हारा नाम नहीं आया
मैं नागरिक हुई
बाबा के ही नाम से
मैं नौकरी पेशा हुई
बाबा के ही नाम से
मैं बेनाम माँ की बेटी
बोलो माँ
तुम्हारा नाम क्या है
किसी का न पूछा
किसी का न बोला हुआ
तुम्हारा नाम
मैं सब को
बताना चाहती हूँ
तुम्हारा नाम
वैसे तो धरती को भी
माँ कहते हैं
पर मुझे तुम्हारा ही नाम चाहिए
बोलो माँ
तुम्हारा नाम क्या है
मूळ नेपाळी कविता
लक्ष्मी माली
Laxmi Mali
हिंदी अनुवाद
दीपक तिरुवा
Deepak Tiruwa