रशिदा

रशिदा

रशिदा

कामवाली रशिदा
जेव्हा मालदा जिल्ह्यातून
रोजगाराच्या शोधार्थ दिल्लीला आली
तेव्हा ती रेणू झाली
तिला सांगितलं गेलं होतं
सभ्य आणि प्रतिष्ठित घरांमध्ये
काम मिळवण्याचा हाच एक 
मार्ग आहे

पण लवकरच सापडली ती,
जेव्हा तिने ईदला सुट्टी मागितली
तिला कामावरून कमी करण्यात आले,
त्या सभ्य आणि प्रतिष्ठित घरांमधून

माणूस ठोकर खाऊनच 
सावरत असतो
सावरली रशिदादेखील
आता ती ईदसाठी सुट्टी मागते
पण कुठल्या तरी बहाण्याने
किंवा न सांगताच गुल होत असते

शिकली आहे ती
सभ्य आणि प्रतिष्ठित 
लोकांबरोबर जुळवून घ्यायला

काळासोबत चालावे लागते ना-
असं म्हणते आणि हसते 
रशिदा ऊर्फ रेणू

रंगीबेरंगी टिकल्यांचा एक मोठा डब्बा
ठेवते आपल्याजवळ
भांगामध्ये भरभरून कुंकू पण 
भरत असते.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

रशीदा 

कामवाली रशीदा
जब मालदा ज़िले से 
रोज़गार की तलाश में दिल्ली आई 
तो रेनू हो गई  
उसे बताया गया था 
सभ्य और संभ्रांत घरों में 
काम पाने का यही एक रास्ता है

पर जल्दी ही पकड़ी गई
जब उसने ईद पर छुट्टी मांग ली
उसकी छुट्टी कर दी गई
उन सभ्य और संभ्रांत घरों से

इंसान ठोकर खाकर ही संभलता है
संभल गई रशीदा भी
अब वह ईद पर छुट्टी मांगती है
किसी बहाने से 
या बिना बताए गोल हो जाती है

सीख गई है वह
सभ्य और संभ्रांत लोगों से निपटना

वक़्त के साथ चलना पड़ता है न
-कहती है और मुस्कुरा देती है
 रशीदा उर्फ़ रेनू

रंग-बिरंगी बिंदियों का एक बड़ा डिब्बा
रखने लगी है अपने पास 
मांग में भर-भरकर सिंदूर लगाती है। 

©संजय कुंदन
Sanjay Kundan

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने