🚩
कल्पनेतले प्रसंग
त्यावरी चढविती रंग
इतिहासाशी गणंग
करती छेडछाड
जात-धुरंधर चित्रकारी
प्रकटते तीच सामोरी
अगा ऐशी हरामखोरी
संतापजनक
चित्रकार हाताशी धरती
ऐसे भ्रम गा पसरविती
जातश्रेष्ठत्वाचा जिरविती
कंडू आपुला!
व्याघ्रचर्म अंथरलेले दिसे
आसनव्यवस्था चोख असे
वज्रासनात राजा नम्र बैसलासे
हात जोडोनिया!
शूद्र कवी तुका बाजूला
श्रेष्ठ स्वामींच्या उपदेशाला
कानात आणूनी प्राणाला
ऐकतो आहे!
उपदेश झाडतो गोसावी
निमूट श्रवणभक्ती करावी
शूद्रांची कैसी ती थोरवी
आम्हांपुढती!
'ब्राह्मण असला जरी भ्रष्ट
जगामाजी तोची सर्वश्रेष्ठ'
गुरूत्व हे आमचे धष्टपुष्ट
लादूनी घ्यावे!
शिष्य-शिष्यिणींचा मेळा
तोचि हा परमार्थ सोहळा
वैराग्याला राज-धर्मकळा
लाभली असे
अज्ञात जे जे इतिहासाला
दिसे ते ते यांच्या नजरेला
सांस्कृतिक कसाईपणाला
तोडचि नाही!
जात अथवा व्यक्तींवर
रोष न कधीही तीळभर
मात्र ऐतखाऊ प्रवृत्तीवर
तुटून पडू!
🚩
-भरत यादव
Bharat Yadav
सुंदर काव्य ..
उत्तर द्याहटवा