उत्तम चोर हे
चोरी करताना
पकडले जात नाहीत
ते इतकेच चोरत असतात ज्यायोगे
त्यांचा निर्वाह होऊ शकेल
ते संपन्न घरांमध्ये चोरी
करत असतात,
ज्यांना माहिती होत नाही की त्यांच्या काही
वस्तु गायब झाल्यात ते
ते चंद्र नव्हे त्याचे चांदणे
चोरत असतात आणि
आनंदी राहतात
ते दास बनण्याचे धोके
उचलत नाहीत
हे काम त्यांनी राजकारण्यांसाठी
सोडून दिले आहे
उत्तम चोरांच्या महत्वाकांक्षा
मर्यादित असतात
ते तितकेच ओझे उचलतात
जितके ते पेलून चालू शकतील
हो ! कधी कधी ते आपल्या
ऐश- आरामासाठी स्त्रियांच्या डोळ्यातून
धुंदी चोरत असतात
आणि काही दिवसांसाठी
सुट्टीवर निघून जातात
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
अच्छे चोर
अच्छे चोर चोरी करते हुए
पकड़े नही जाते
वे इतना ही चुराते है जिससे
उनका जीवन चल सके
वे सम्पन्न घरों में चोरी
करते है जिन्हें पता नही चलता
कि उनका कोई सामान गायब
हुआ है
वे चांद नही उसकी रोशनी
चुराते है और खुश रहते है
वे दस्यु बनने के खतरे
नही उठाते
यह काम उन्होंने राजनेताओं
के लिए छोड़ दिया है
अच्छे चोरों की महत्वाकांक्षाएं
सीमित होती है
वे उतना ही बोझ उठाते है
जितना वे उठा कर चल
सके
हां ! कभी कभी वे अपनी
विलासिता के लिए स्त्रियों
की आंख से नशा चुरा
लेते है
और कुछ दिनों के लिए
छुट्टी पर चले जाते हैं
©स्वप्नील श्रीवास्तव
Swapnil Shrivastav