तुम्ही कधी कुठला बुलडोझर पाहिलाय,
जो बरोब्बर एखाद्या डोकं फिरलेल्या शासकाच्या
मेंदूसारखा असतो
मागचा पुढचा काही विचार करत नाही,
त्याला फक्त आदेश हवा असतो
आणि तो तोडफोड सुरू करतो
डोकं फिरलेला सत्ताधीश जसा कल्पनेत चिरडत असतो,आपल्या
विरोधात उठणार्या आवाजाला,तसा
बुलडोझरसुद्धा शाबूत ठेवत नाही
कुठल्याच वस्तुला
डोकं फिरलेला सत्ताधीश सांगायचे विसरून जातो
की बुलडोझरला काय तोडायचे आहे
आणि कधी थांबायचे आहे ते
डोकं फिरलेला सत्ताधीश
स्वप्नांच्या दुनियेतून जेव्हा बाहेर येतो
देश आजोर्याचा ढिगारा
बनलेला असतो
डोकं फिरलेला सत्ताधीश
आजोर्याच्या ढिगार्यावर उभे राहाण्याचा प्रयत्न करतो
पण त्याचा पाठीचा कणा मोडला आहे
तो जोरजोराने हसू पाहतो आहे
पण बुलडोझरने तोडून टाकलेयत त्याचेही सगळे दात
बुलडोझर कुणाला ओळखत नाही
बुलडोझर सगळं काही तोडून-फोडून
बाजूला उभं ठाकलंय
पुढच्या आदेशासाठी!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
बुलडोजर
तुमने कभी कोई बुलडोजर देखा है
वो बिल्कुल एक सनकी शासक के दिमाग़
की तरह होता है
आगा पीछा कुछ नहीं सोचता,
उसे बस एक हुक़्म की ज़रूरत होती है
और वह तोड़-फोड़ शुरू कर देता है
सनकी शासक कल्पना में कुचलता है
जैसे विरोध में उठ रही आवाज़ को
बुलडोजर भी साबुत नहीं छोड़ता किसी भी
चीज़ को
सनकी शासक बताना भूल जाता है
कि बुलडोजर को क्या तोड़ना है
और कब रूक जाना है
सनकी शासक ख़्वाबों की दुनिया से जब बाहर आता है
मुल्क़ मलबे का ठेर बन चुका होता है
सनकी शासक मलबे के ढेर पर खड़े होने की
कोशिश करता है
पर उसकी रीढ़ टूट चुकी है
वह ज़ोर-ज़ोर से हँसना चाहता है
पर बुलडोजर ने तोड़ डाले है उसके भी सारे दाँत
बुलडोजर किसी को नहीं पहचानता है
बुलडोजर सब कुछ तोड़कर
बगल में खड़ा है
अगले आदेश के लिए !
©राजेश जोशी
Rajesh Joshi
( १८ जुलै वाढदिवस )