🚩
आता नववैदिकतेचा सुकाळ
सुरू वंचितांचा मरणकाळ
जबडा हा अक्राळविक्राळ
ब्राह्मण्याचा
अगा सर्वोच्च संवैधानिकपदी
निवडती मर्जीतली प्यादी
संविधान मूल्य विरोधी गर्दी
वाढविती
कर्मकांडाचे माजविती स्तोम
त्यातून ना सुटती महामहिम
असा पुरोहितशाहीचा जोम
वाढताहे
आदिवासी म्हणून गोंजारती
जल-जमीन-जंगल लूटती
बेघर करून साधनसंपत्ती
हडपती
क्रूर मनुस्मृती संहितेनुसार
करू पाहाती राज्यकारभार
मग ते संविधान गाभ्यावर
घालतील घाव
वंचितवर्गापुढे फेकून
पदाचे तुकडे चार-दोन
धनदांडग्यांना आंदण
देती देश
पुष्यमित्र शुंग-हेमाद्रीच्या
अवलादी मातल्या शिंच्या
मिटवू पाहाती अशोकाच्या
थोर स्मृती
गरिबांची ना कसली चिंता
नित्य डावलती लोकहिता
मूठभरांसाठी बलाढ्य सत्ता
राबविती
राष्ट्रध्वजसक्तीच्या आडून
सुरू भेदाभेदाचे राजकारण
राष्ट्रीय सणांचे सौहार्दभान
हिरावती
स्वातंत्रसंग्रामी नाही योगदान
तेच देती देशभक्तीची शिकवण
ब्रह्मकमळदळी प्रचंड घाण
साचलेली
मूळ निखळ सुंदर संस्कृती
ती वर साचली धूळ-विकृती
सत्य शोधून असत्याप्रती
राहू सजग
🚩
-भरत यादव
Bharat Yadav