एके दिवशी जंगलाच्या राजाच्या
मनात आलं की जंगलवासियांमध्ये
जंगलभक्ती कमी होत चालली आहे.
त्याने जाहीर केले
जंगलातल्या प्रत्येक पशू-पक्षांच्या
गुहेवर-घरट्यावर
एक झेंडा फडकवला जाईल!
झेंड्यावर दातांना रक्त लागलेल्या सिंहाचा उग्र चेहरा असेल!!
शेवटी भक्तीसाठी भीती ही
गरजेची आहे ना.
लांडग्यांमध्ये आनंदाची लाट उसळली.
कारण या आदेशाला लागू करण्याची जबाबदारी त्यांनाच दिली जाणार होती.
कोल्हेसुद्धा खुश होते
झेंडे बनवण्याची आॅर्डर शेवटी त्यांनाच मिळणार होती.
परंतू ससा,हरीण यांसारख्या
अनेक प्राण्यांच्या मनात भीती
बसली होती..
ज्यांची शिकार होण्यापासून वाचण्यासाठी सगळे आयुष्य
खर्ची पडत आले होते..
त्याचाच हिंसक-उग्र चेहरा त्यांना
आपल्या डोक्यावर पाहायचा होता,
आणि दिवसभर त्याची राखण पण करायची होती.....
पण ते असहाय्य होते...
असो,
अखेर तो दिवस उगवलाच
सर्वांच्या घरावर झेंडा फडकलाच!
सिंह आणि लांडग्यांनी झेंड्याखालीच
आपापली शिकार फाडून खाल्ली
आणि झेंड्याला वंदन केले!
रक्ताचे शिंतोडे झेंड्यावरदेखील
उडाले!!
आणि ठाऊक नाही काय
चमत्कार झाला,
झेंडे पूर्ण गतीने फडकू लागले..
खरेतर जंगलातून वारे गडप झाले होते
आणि उकाड्यामुळे झाडं-झुडूपं सुद्धा
त्रासली होती
तिकडे ससे,हरिण यांसारख्या प्राण्यांवर
चरण्यासाठी बंदी होती
त्यांना दिवसभर झेंड्याची राखण
जी करायची होती.
संध्याकाळ होता होता
भुकेने व्याकूळ या प्राण्यांची आतडी
पिळवटून निघू लागली
तोच एका सशाने सर्वांची नजर चुकवून झेंड्याला कुरतडण्यास सुरूवात केली
यामुळे त्याची भूक तर भागत होती परंतू
एक मानसिक समाधान पण मिळायला लागले होते,
झेंड्यावर चितारलेल्या हिंस्त्र
सिंहाला खाण्याचे.
रात्रीपर्यंत इतर प्राण्यांनीही
झेंड्याला चघळण्यास सुरूवात केली..
सकाळ सकाळी ही बातमी जंगलात,
जंगलातल्या आगीप्रमाणे पसरली होती की
विशिष्ट जातीच्या
प्राण्यांनी झेंड्याला चघळून,कुरतडून
त्याचा अपमान केला आहे!
'जंगल-द्रोह' केला आहे!!
लांडग्यांची फौज सक्रीय झाली
मोठ्या प्रमाणात 'जंगल द्रोहीं'ना
धरले वा मारले जाऊ लागले!
सिंहाने एका उंच जुन्या
पर्वतावरून घोषणा केली
'हे जंगल
'जंगलभक्त आणि जंगल द्रोही यांच्यात
विभागले गेले आहे!
'जंगलद्रोहींना' या जंगलातून नष्ट करायचे आहे!!
तेव्हाच आम्ही जंगलाचा विकास करू शकणार आहोत......
---------
यानंतरची कथा मला ठाऊक नाही...
परंतू नंतर,
जंगलातील इतिहासकारांनी लिहिले,
की याच्या बरोब्बर नंतर हे देखणे जंगल
एका राष्ट्रात बदलून गेले होते!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
एक रोज जंगल के राजा के दिमाग में आया
कि जंगल निवासियों में
जंगल भक्ति कम होती जा रही है.
उसने ऐलान किया
जंगल के हर पशु पंछियों के डेरे पर
एक झंडा फहराया जाएगा!
झंडे पर दाँतों में खून लगे शेर का हिंसक चेहरा होगा!!
आखिर भक्ति के लिए भय तो ज़रूरी है न.
भेड़ियों में खुशी की लहर थी.
क्योंकि इसे लागू करने की ज़िम्मेदारी उन्हें ही दी जानी थी..
लोमड़ियां भी खुश थी
झंडे बनाने का ऑर्डर आखिर उन्हें ही मिलना था.
लेकिन खरगोश, हिरन जैसे बहुत से जानवरों में डर व्याप्त था..
जिसका शिकार बनने से बचने में उनकी पूरी ज़िंदगी खप जाती थी...
उसका हिंसक चेहरा उन्हें अपने सर के ऊपर देखना था.
और दिन भर उसकी रखवाली भी करनी थी...
लेकिन वे मजबूर थे...
खैर, वह दिन आ ही गया
सबके डेरे पर झंडा फहर ही गया!
शेर और भेड़ियों ने झंडे के नीचे ही अपना अपना शिकार
फाड़ कर खाया
और झंडे को सलामी दी!
खून के छीटें झंडे पर भी पड़े!!
और पता नहीं क्या चमत्कार हुआ
झंडे पूरी गति से लहराने लगे...
हालांकि जंगल से हवा गायब थी,
और उमस से पेड़ पौधे भी परेशान थे.
उधर खरगोश, हिरन जैसे जानवरों के चरने पर पाबंदी थी.
उन्हें दिन भर झंडे की निगरानी जो करनी थी.
शाम होते होते
भूख से बेहाल इन जानवरों की अंतड़ियां मरोड़ने लगी.
तभी किसी खरगोश ने सबकी नज़र बचाते हुए
झंडे को ही कुतरना शुरू कर दिया.
इससे उसकी भूख तो मिट ही रही थी
लेकिन एक मानसिक सुख भी मिल रहा था
झंडे पर बने हिंसक शेर को खाने का.
रात तक अन्य जानवरों ने भी
झंडे को चबाना शुरू कर दिया..
सुबह सुबह यह खबर
जंगल में, जंगल की आग की तरह फैल गयी.
कि खास खास प्रजाति के जानवरों ने
झंडे को चबाकर, कुतरकर
उसका अपमान किया है!
' जंगल-द्रोह' किया है!!
भेड़ियों की फौज सक्रिय हो गयी
बड़ी संख्या में 'जंगल द्रोहियों' को पकड़ा या मारा जाने लगा!
शेर ने एक ऊंची पुरानी पहाड़ी से ऐलान किया
' यह जंगल
'जंगल भक्तों' और 'जंगल द्रोहियों' में बट चुका है!
'जंगल द्रोहियों' को इस जंगल से समाप्त करना है!!
तभी हम जंगल का विकास कर पाएंगे........
........ '
इसके बाद की कहानी मुझे नहीं पता..
लेकिन बाद में,
जंगल के इतिहासकारों ने लिखा,
कि इसके ठीक बाद यह खूबसूरत जंगल
एक 'राष्ट्र' में तब्दील हो चुका था!
©मनीषआज़ाद
Manish Azad