तुझी दया नाही येत
संताप उफाळतो एकलव्या
तू ओळखू नाही शकलास
की ज्याला तू गुरू समजून भजत राहीलास
तो शिष्यघातक्या आहे,
गुरू नव्हे
ज्ञान तर त्याने तुला दिले नाही
जे काही ज्ञान तू घेतलेस,
स्वतः प्राप्त केलेस
आणि जे शिकला होतास,
त्याने हिसकावून घेतले
तर मग गुरूदक्षिणा कसली रे?
हा सवाल उसळला तर असेल
तुझ्या मनामध्ये
मग तोंड का नाही उघडलेस?
तुझे हेच मौन
माझ्या उरात त्रिशूलासारखे
खूपते रे एकलव्या!
तुझ्याविषयी करूणा नाही वाटत
चीड येते
की जिथे तो विद्रोह करायला हवा होतास
तिथे तू गुडघे टेकलेस
आणि जिथे तुला आवाज उठवायचा होता तिथे तोंड शिवून घेतलेस
तू हे नाही पाहू शकलास
की सत्तेच्या मिठाच्या ओझ्याखाली
दबलेला व्यक्ती भाड्याचा तट्टू असू शकतो,
गुरू नव्हे!
भाड्याच्या तट्टाला
गुरू मानण्याची चूक करून बसलास एकलव्या!
ही चूक तुझ्या भक्तीवर भारी पडली
तुझ्याविषयी सहानुभूती नाही वाटत
तुझ्या भावनिकतेवरुन आक्रोश दाटून येतो
तुझा कापलेला अंगठा माझ्या डोळ्यासमोर उसळ्या मारत मला चिडवतोय आणि मी निराशेने भरून जातो की जिथे तुला विद्रोहाचा बिगूल फुंकायचा होता आणि जिथे तुला उचलायचे होते धनुष्य-बाण
आणि जिथे तुला अधर्माला आव्हान द्यायचे होते
तिथे आपला बळी देऊन बसला आणि आपल्या सर्वास्वाचा नाश करूनदेखील
भले ही तू लढला असतास त्या शिष्यघातक्याशी
हेच न घडते की मारला गेला असतास
अंगठा कापून ज्याप्रकारे मारला गेलायस
योग्य ठरते की अत्याचाराविरूद्ध लढून मेला असतास
तो मृत्यू या मरणापेक्षा श्रेयस्कर असता
मी तुला कसे माफ करू एकलव्या?
तुला माफ करणे म्हणजे अनर्थ आणि अत्याचाराविरूद्धची प्रत्येक लढाईला नाकारणे होय
तुला माफ करणे म्हणजे कपट आणि बेईमानीच्या बाजूने उभे राहाणे होय
तुला माफ करणे प्रत्येक अत्याचारीच्या समर्थनार्थ आपली मोहोर उमटविणे होय
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
कैसे क्षमा कर दूँ एकलव्य?
तुम पर दया नहीं आती
क्रोध उपजता है एकलव्य
तुम पहचान नहीं पाये
कि जिसे तुम गुरु मानकर पूजते रहे
वह शिष्यहन्ता है, गुरु नहीं
गुर तो उसने तुम्हें दिये नहीं
जो भी गुर तुमने सीखे, स्वयं सीखे
और जो भी सीखे, उसने छीन लिये
तो फिर गुरुदक्षिणा काहे की
यह सवाल उठा तो होगा तुम्हारे मन में
फिर मुँह क्यों नहीं खोले?
तुम्हारी यह चुप्पी
मेरी छाती में शूल की तरह चुभती है एकलव्य
तुम पर करुणा नहीं उपजती
खीज आती है
कि जहाँ तुम्हें प्रतिरोध करना था
वहाँ तुमने घुटने टेक दिये
कि जहाँ तुम्हें आवाज़ उठानी थी
वहाँ मुँह सिल लिये
तुम यह नहीं देख पाये
कि सत्ता के नमक के बोझ तले दबा व्यक्ति
भाड़े का टट्टू तो हो सकता है, गुरु नहीं
भाड़े के टट्टू को
गुरु समझने की भूल कर बैठे एकलव्य
यह भूल तुम्हारी श्रद्धा पर भारी पड़ गयी
तुम पर सहानुभूति नहीं उतरती
तुम्हारी भावुकता पर आक्रोश घेर लेता है
तुम्हारा कटा अँगूठा मेरी आँखों के सामने
उछल-उछल कर मुझे मुँह चिढ़ाता है
और मैं आत्मग्लानि से भर जाता हूँ
कि जहाँ तुम्हें विद्रोह का बिगुल फूँकना था
कि जहाँ तुम्हें उठा लेने थे तीर-धनुष
कि जहाँ तुम्हें अधर्म को ललकारना था
वहाँ अपनी बलि चढ़ा बैठे
और नाश कर बैठे अपना सर्वस्व
काश तुम लड़ते युद्ध उस शिष्यहन्ता से
यही न होता कि मारे जाते
अँगूठा कटवाकर जिस तरह मारे गये
उचित होता कि अनाचार के विरुद्ध लड़कर मारे जाते
वह मृत्यु इस मृत्यु से श्रेयस्कर होती
मैं तुम्हें कैसे क्षमा कर दूँ एकलव्य?
तुम्हें क्षमा करना अनर्थ और अत्याचार के विरुद्ध
हर लड़ाई को सिरे से ख़ारिज कर देना है
तुम्हें क्षमा करना छल और बेईमानी के
पक्ष में खड़ा हो जाना है
तुम्हें क्षमा करना
हर आततायी के समर्थन में
अपनी मुहर लगा देना है
©Kundan Sidharth
कुंदन सिद्धार्थ
हृदय से आभार भाई भरत यादव जी
उत्तर द्याहटवा