रक्तबंबाळ काही लेकरं
आता-आत्ताच आईच्या पोटातून
बाहेर पडले आहेत तिथे
काहींनी आता-आत्ताच
उघडलेयत डोळे
कुठल्या रंगाशी त्यांचे काही
देणेघेणे नाही
काढताहेत विचित्र पण
सुरेल आवाज
अद्याप त्यांची कुठली भाषा नाहीये
जगातल्या कुठल्याही
लिपीपासून मुक्त
त्यांच्या आडव्या-तिरक्या रेघांमध्ये
लपलीये
ब्रह्मांडातली
सर्वात सुंदर अभिव्यक्ती
तिथेही इथल्याप्रमाणेच दप्तर
पाठीशी अडकवून घरातून निघालेत
हजारो लेकरं
माऊल्यांनी आता-आत्ताच
आवरलेय सारवण
डोळे टांगलेयत दारावरती
आणि म्हणूनच मी
विरूद्ध आहे
अशा प्रत्येक व्यक्तीच्या
जी एखाद्या देशाच्या नावाच्या
पुढे वा मागे अवमानजनक
संबोधन लावून
सिद्ध करू पाहातो आहे
आपली देशभक्ती
मला वाटते की
जिवंत राहायला हवाय
प्रत्येक देश
प्रत्येक देशासाठी म्हटले जायला हवे
जिंदाबाद
मारून टाकायला हवाय
तिरस्कार
जो काही लोकांच्या हृदयात
इथेही आहे तिथेही आहे.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
मैं ख़िलाफ़ हूँ
खून से लथपथ कुछ बच्चे
अभी-अभी माँ की कोख से
बाहर निकले हैं वहाँ
कुछ ने अभी-अभी खोली हैं आँखें
किसी रंग से उनका कोई वास्ता नहीं
निकाल रहे हैं अजीब लेकिन
सुरीली आवाज़ें
अभी उनकी कोई भाषा नहीं
दुनिया की किसी भी लिपि से मुक्त
उनकी आड़ी-तिरछी लकीरों में
छिपी है ब्रह्मांड की सबसे सुंदर अभिव्यक्ति
वहाँ भी यहाँ की ही तरह बस्ता टांगें
घर से निकले हैं हज़ारों बच्चे
माँओं ने अभी-अभी समेटा है चौका
आँखें टाँग दी हैं दरवाज़े पर
और इसलिए मैं ख़िलाफ़ हूँ
हर उस शख़्स के
जो किसी देश के नाम के आगे या पीछे
अपमानजनक सम्बोधन लगाकर
साबित करना चाहता है अपनी देशभक्ति
मुझे लगता है
जिंदा रहना चाहिए हर देश
हर देश के लिए कहा जाना चाहिए जिंदाबाद
मार डाली जानी चाहिए नफ़रत
जो कुछ लोगों के दिल में
यहाँ भी है वहाँ भी।
©शेफाली शर्मा
Shefali Sharma