माझे पूर्वज

माझे पूर्वज

माझे पूर्वज

मी खुश आहे
की मला
आपल्या पूर्वजांविषयी माहित नाही
मला माहिती नाही
कारण ते इतिहासात नाहीयेत
ते इतिहासात नाहीयेत...
कारण ते आक्रमक नव्हते
त्यांनी कुठली नगरे नाही जिंकली
कुठली गावे नाही जाळली
त्यांनी स्त्रियांवर बलात्कार नाही केले
त्यांनी निष्पाप बालकांची डोकी धडावेगळी केली नाहीत
ते धर्माधिकारी नव्हते
ते जमीनदार नव्हते
नक्कीच ते दरोडेखोर नव्हते
जर असते तर त्यांचेही शिलालेख असते
कुण्या मंदिराला दान दिल्याचे
कुण्या भटाला जमीन दिल्याचे
माझ्या पुर्वजांनी कर नाही वसूल केला
माझ्या पूर्वजांनी व्याज नाही खाल्ले
मी खुश आहे की
माझ्या पूर्वजांनी शास्त्र नाही लिहिले
मी खुश आहे
त्यांनी शास्त्र नाही वाचले
मी खुश आहे
ते शास्त्र नाही जगले
मी खुश आहे
की हातामध्ये पडताच त्यांनी शास्त्रं जाळली होती
मी खुश आहे की
माझ्या पूर्वजांनी गाय आणि म्हैस 
दोन्हींना खाल्ले होते
मी खुश आहे
की माझे पूर्वज नरभक्षक नव्हते
मी कृतज्ञ आहे आपल्या सर्व पूर्वजांबद्दल की त्यांनी कुठलेही कारण शिल्लक नाही ठेवले शरमिंदेपणाचे
मी आभारी आहे की
माझ्या पूर्वजांनी मला अशी खुशी दिलीय की असा 
आनंद प्रदान केलाय
जो भुतकाळातला अभिमान आणि लाज
दोन्हींना एकाच जागी बघतो,
समान अंतरावरून बघतो
आणि निश्चितपणे हसतो आहे आनंद
माझ्या पूर्वजांनो
मला ठाऊक आहे
की एक दिवस असेही तंत्रज्ञान असेल
ज्याच्यामदतीने अनंतकाळापासून 
अंतरिक्षात तरंगणार्‍या सगळ्या 
क्रूर कृत्यांना मोजले जाईल
माझ्या पूर्वजांनो....आपले आभार
की तेव्हा आपल्या वाट्याला शून्य येईल 
आपले हे शून्यच माझे भूत-वर्तमान आणि भविष्य आहे
माझ्या पूर्वजांनो....
हा शून्याचा वारसा राखल्याबद्दल
आपले आभार...
माझ्या पूर्वजांनो...
आपल्याप्रमाणेच माझीही कसली इच्छा नाहीये
साम्राज्य उभारण्याची
मी तर फक्त काही भिंतींना तोडेन
माझ्या पूर्वजांनो...
आपले आभार
कारण तुमच्यामुळेच
मी इथे आहे....
मी खुश आहे
मी इथे आहे...
कारण मला काही तोडायचंय
माझ्या पूर्वजांनो आपले आभार
तुमच्यामुळेच...
तुमच्यामुळेच माझ्या शरीरात रेड्याची ताकद आहे....

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

युवा हिंदी कवी मोहन मुक्त
यांचा पहिला कवितासंग्रह 'हिमालय दलित है'
लवकरच समय साक्ष्य प्रकाशनकडून प्रकाशित 
होत आहे.

मूळ हिंदी कविता

मेरे पुरखे...

मैं ख़ुश हूँ
कि मैं ...
अपने पुरखों के बारे में नहीं जानता 
मैं नहीं जानता... 
क्योंकि वो इतिहास में नहीं हैं 
वो इतिहास में नहीं हैं ...
क्योंकि वो आक्रमणकारी नहीं थे 
उन्होंने कोई नगर नहीं जीते 
कोई गांव नहीं जलाये 
उन्होंने औरतों के बलात्कार नहीं किये 
उन्होंने अबोध बच्चों के सर नहीं काटे
वो धर्माधिकारी नहीं थे 
वो जमींदार नहीं थे 
निश्चित ही वो लुटेरे नहीं थे 
अगर होते तो उनकी भी प्रशस्तियाँ होती 
किसी मंदिर को दान देने की 
किसी ब्राह्मण को जमीन देने की 
मेरे पुरखों ने टैक्स नहीं लिया 
मेरे पुरखों ने सूद नहीं वसूला 
मैं खुश हूँ कि 
मेरे पुरखों ने शास्त्र नहीं लिखे 
मैं ख़ुश हूँ कि 
उन्होंने शास्त्र नहीं पढ़े 
मैं ख़ुश हूँ कि 
उन्होंने शास्त्र नहीं जिए 
मैं ख़ुश हूँ कि
हाथ में आते ही उन्होंने शास्त्र जला दिये थे 
मैं ख़ुश हूँ कि
मेरे पुरखों ने गाय और भैंस दोनों को खाया था 
मैं ख़ुश हूँ कि 
मेरे पुरखे आदमखोर नहीं थे 
मैं कृतज्ञ हूँ अपने सभी पूर्वजों का कि
 उन्होंने मुझे कोई वज़ह नहीं दी है शर्मिंदगी की 
मैं शुक्रगुज़ार हूँ कि 
मेरे पुरखों ने मुझे ख़ुशी दी है 
ऐसी ख़ुशी ...
जो अतीत के गर्व और शर्म ....
दोनों को एक ही जगह पर देखती है,
बराबर दूरी से देखती है 
और निश्छल मुस्कुराती है 
मेरे पुरखो...
मैं जानता हूँ 
कि एक दिन ऐसी भी तकनीक होगी 
जिसके सहारे अनंत काल से 
अंतरिक्ष मे तैर रहे सारे क्रूर अट्टहास ...
गिन लिए जाएंगे
मेरे पुरखो... आपका शुक्रिया 
कि आपके हिस्से में शून्य आएगा
आपका ये शून्य ही मेरा अतीत वर्तमान और भविष्य है
मेरे पुरखो...... 
इस शून्य की विरासत के लिए 
आपका शुक्रिया ...
मेरे पुरखो ...
आप जिए और मरे 
लेकिन आप  मुझे छोड़ गये 
मेरे  पुरखों....
आप की ही तरह मेरी भी कोई इच्छा नहीं है
साम्राज्य बना लेने की 
मैं तो बस कुछ दीवारों को तोड़ डालूंगा 
मेरे पुरखो ...
आपका शुक्रिया  
कि आपके कारण ही 
मैं  यहाँ  हूँ  ...
मैं ख़ुश हूँ 
मैं यहाँ हूँ ....
क्योंकि मुझे कुछ तोड़ना है 
मेरे पुरखो आपका शुक्रिया 
आपके कारण ही .....
आपके कारण ही मेरे शरीर में भैंसे की ताक़त है......

©Mohan Mukt
मोहन मुक्त 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने