राजा
झोपी गेला होता
गाढ
पेंगत होते भक्तगण
गिधाडाला वाटलं
मेलाच आहे राजा
त्यानं हल्ला केला आणि
दोन्ही डोळे काढून घेतले
राजा वेदनेने चित्कारला
भक्तगण वीजेच्या वेगाने उठले
पकडले गिधाड
सर्वात आधी गिधाडाचे डोळे काढण्यात आले
राजाला लावण्यात आले
त्यानंतर
भक्तांनी खाल्लं
गिधाडाचे रूचकर मांस
गिधाड बनलेला राजा
आणि
त्याचे भक्त
आता झोपी जात नव्हते
मराठी अनुवाद
भरत यादव
@bharat yadav
मूळ हिंदी कविता
राजा
सोया था गहरी नींद
ऊँघ रहे थे भक्तजन
गिद्ध ने समझा मृत है राजा
उसने आक्रमण किया और दोनों आँखे निकाल ली
राजा दर्द से चिल्लाया
भक्तजन बिजली की फुर्ती से उठे
दबोच लिया गया गिद्ध
सबसे पहले गिद्ध की आँखे निकाली गयी
राजा को लगा दी गयी
उसके बाद
भक्तों ने खाया
गिद्ध का स्वादिष्ट मांस
गिद्ध हुए राजा और उसके भक्त
अब सोते नहीं थे
©वीरेंदर भाटिया
virendar bhatia