सत्यशोधकी अभंग !

सत्यशोधकी अभंग !

सत्यशोधकी अभंग!
🚩
विवेकाचे श्राद्ध
घातले अखेर
महाराष्ट्र थोर
पुरोगामी!

धन्य तो उठाव
धन्य बंडखोरी
दिल्लीची चाकरी
पत्करली

धन्य पिलावळ
ब्राह्मण्यवादाची
संविधानवाद्यांची
पिछेहाट

'याचसाठी केला
होता अट्टाहास'
फेडला नवस
असत्याचा

हिंदुत्वाचे नवे
सुरू झाले पर्व
दिल्लीलाही गर्व
वाटे सार्थ

भ्रष्टाचारी नेते
शुद्ध-स्वच्छ झाले
नवे यंत्र आले
हिंदुत्वाचे!

शिंदेशाहीमुळे
पेशवाईला बळ
मनुस्मृती काळ
दूर नाही

धर्माच्या अफूची
लोकां पडे भूल
प्रबोधन फोल
ठरतसे

माजल्या सर्वत्र
असत्याच्या चाली
सत्याला ना वाली
उरलेला

लोक आणि राष्ट्र
वाचवावे कसे
फेकताती फासे
धर्मखोर
🚩
  -भरत यादव
Bharat Yadav

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने