भावना

भावना

भावना

भावना म्हणजे
गल्लीत भटकणारी
मोकाट कुत्री असतात,
तिकडून जात असलेला एखादा वाटसरू 
दगड भिरकावतो आणि
त्या दुखावल्या जातात लगेच.

गोदामात पडलेला कापसाचा
बिंडा असतात भावना
कुठलीशी ठिणगी कुठूनतरी येते
आणि सुन्न मेंदूंच्या गोदामात
भावना पेटायला लागतात

भुश्शाचा ढिगारा असतात भावना
आणि कुणीतरी न विझवता फेकतो
बिडीचे शिल्लक राहिलेलं थोटुक
जणू अफवांचे वारे,
भावनांना भडकावून सोडतात

पाच वर्षाच्या वयात
खेचलेल्या दोरखंडावरून चालण्याची करामत दाखवणार्‍या
चिमुरडीला पाहून दुखावल्या जात नाहीत कुणाच्या मंदबुद्धी भावना

बलात्कार पिडितेला निर्लज्ज प्रश्न
विचारणार्‍या वकिलाला ऐकून
नाहीत पेटत नशेत धुंद असलेल्या
धर्मांध लोकांच्या उथळ भावना

एक वर्षाहूनही जास्त काळ
आंदोलनरत राहिलेल्या शेतकर्‍यांना पाहून आणि 
बहात्तर कृषकांच्या अकाली मृत्यूने नाही भडकली 
कुण्या पुढार्‍याची भावना त्या 
क्रूर काळातदेखील

बोलायला नको पण, 
अवश्य बोलले पाहिजे, 
राजकारण सुरू आहे
भावनांचे धर्माच्या नावावर उघडपणे

बाजारात विकायला ठेवल्यात 
नाही विकल्या गेल्या आणि 
नासल्या-सडल्या तर
दुखावू लागतात दुर्गंधीयुक्त भावना

संकुचित भावनांच्या या छद्मी काळात
मी सद्भावना शोधतो आहे
पण त्या दूरदूरवर तरी भेटताना 
दिसत नाहीत.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

गली में भटकता हुआ आवारा 
कुत्ता होती हैं भावनायें
उधर से गुज़रता हुआ कोई राहगीर
पत्थर मार देता है और 
तत्काल ही आहत हो जाती हैं

गोदाम में पड़ा हुआ रूई का 
गठ्ठर होती हैं भावनायें
कोई चिंगारी कहीं से आती है और
कुंद दिमाग़ों के गोदाम 
में भावनायें सुलगने लगती हैं 

भूसे का ढ़ेर होती हैं भावनायें 
और बिना बुझाये फेंक 
देता है कोई बीड़ी का बचा टोंटा 
कि अफ़वाहों की हवायें 
भावनाओं को भड़का देती हैं 

पाँच साल की उम्र में तनी हुई 
रस्सी पर चलने का करतब दिखाती
बच्ची को देख कर आहत नहीं होती 
किसी की मन्दबुद्धि भावनायें 

बलात्कार पीड़िता से बेहूदा सवाल
करते वकील को सुन कर
नहीं सुलगती नशे में मस्त
धर्मांध लोगों की छिछली भावनायें 

एक साल से भी ज़्यादा आँदोलित 
किसानों को देखते और
बहत्तर किसानों की अकाल मृत्यु से 
नहीं भड़की किसी नेता 
की भावनायें उस क्रूर काल में भी

कहना नहीं चाहिये पर कहूँगा अवश्य 
कि राजनीति हो रही है 
भावनाओं की धर्म के नाम पर स्पष्टत:

बाज़ार में बिकने को रखी हैं भावनायें
नहीं बिकीं और सड़ गईं
तो आहत होने लगती हैं दुर्गंध मारतीं

संकीर्ण भावनाओं के इस छद्म काल में 
मैं सद्भावनायें ढूँढ़ रहा हूँ
लेकिन वे दूर दूर तक नहीं मिल पा रहीं 

©कैलाश मनहर
Kailash Manhar 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने