ईश्वर विकणार्यांजवळ ईश्वर नाहीये
शांतता विकणार्यांजवळ शांतता नाही
विकास विकणार्यांजवळ विकास नाही
देश विकणार्यांनी कणभरसुद्धा
नाही घडवला देश
देश लुटणार्यांनी देशाच्या खजिन्यात नाही घातला
आपला पूर्ण अंश
जितका घातला त्याच्यापेक्षा शेकडो पटीने जास्त लुटले
गरीब
ईश्वर विकणार्यांकडे बघत राहिला
शांततेची वाट तुडवत राहिला
विकास विकणार्यांकडे पाहात राहिला
लुटणार्यांनी
त्याच गरीबाचा वाटा हडपला
आणि गरीबाचे मायबाप बनून राहिले
गरीब
मायबाप सरकारच्या सेवेत रत आहे
मायबाप सरकार त्याच्याच बोकांडी बसलंय
आपल्या पाठीच्या कण्याला खतपाणी देतोय
गरीबाला शिकवा
गरीबाला सांगा
की पाठीचा कणा मोकळा कर आपला
फक्त आपापले मायबाप
( सरकार ) खाली पाडा
तुम्ही उभे राहू लागाल.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
माईबाप
ईश्वर बेचने वालों के पास ईश्वर नहीं है
शांति बेचने वालों के पास शांति नहीं है
विकास बेचने वालों के पास विकास नहीं है
देश बेचने वालों ने रत्ती भर नहीं बनाया देश
देश लूटने वालों ने देश के ख़ज़ाने में नहीं डाला अपना पूरा अंश
जितना डाला उससे सैंकड़ो गुना ज्यादा लूटा
गरीब
ईश्वर बेचने वालों की ओर देखता रहा
शांति की बाट जोहता रहा
विकास बेचने वालों को ताकता रहा
लूटने वालों ने
उसी गरीब का हिस्सा लूटा
औऱ गरीब के माईबाप बने रहे
गरीब
माईबाप की सेवा में हाजिर है
माईबाप उसी की रीढ़ पर बैठा
अपनी रीढ के मनकों को खाद दे रहा है
गरीब को पढ़ाओ
गरीब को बताओ
कि रीढ़ हल्की करो अपनी
बस अपने-अपने माईबाप नीचे गिरा दो
तुम खड़े होने लगोगे।
©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia