मोडके तोडके फटके

मोडके तोडके फटके

मोडके तोडके फटके!
🚩
माफीनाम्याची परंपरा
पुढे पुढे जाताना
देशबुडवे माफीवीर
समाज पोखरताना

यांच्या पूर्वसुरींनी चक्क
पेन्शन पण खाल्लेली
परकीयांची खुशामत
स्वकियांना लुबाडताना

शोषकांना साथ दिली
आता सांगती देशभक्ती
स्वातंत्र्यसंग्रामी काहीच
सहभाग नसताना

विषमतावादी व्यवस्थेचे
उघड उघड वाहक
फॅसिस्टांचे कौतुक यांना
घटनात्मक पदे भोगताना

काळी टोपी आणि
काळेकुट्ट विचार
काळ्या मनुची विकृती
वेगाने फोफावताना

संविधानशून्य संवेदना
समताद्रोही आचार
लोकविरोधी अजेंडे
उघडपणे राबविताना

पांचट-पुळचटांची सद्दी
तोंडाळ षंढांची गर्दी
महाराष्ट्राची प्रतिष्ठा
आज धूळीस मिळताना

कणखर सह्याद्रीची
रग गेली कुठे?
लाळघोटे पायचाटे यांचा
सुळसुळाट असताना

महाराष्ट्र मेला,अन् 
मराठाही संपला?
सत्तालोभी फितूर
दिल्लीपुढे सरपटताना
🚩
             -भरत यादव
              Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने