यायचे तर असे येऊ नका
जसे गोठा तोडून घुसतात गायी
आणि चरून जातात
गवत,पिकं आणि फुलं.
जशा येतात वावटळी
आणि पाडतात पालथे
घर,झाड आणि छप्पर.
जसा येतो व्यापारी
आणि हिरावून घेतो
जल,जंगल आणि जमीन.
यायचे तर असे या
जशा पायथ्यापर्यंत पोहोचता-पोहोचता
शांत होत जातात नद्या.
जसा आपल्या इच्छितस्थळी पोहोचण्याआधी
काही वेळ आराम करत असतो प्रदीर्घ आणि खडतर
प्रवासावर निघालेला प्रवासी.
पर्वतांवर जेव्हाही याल
तेव्हा निःसंशयपणे सोबत घेऊन या
आपले सगळे त्रास,
सगळ्या वेदना आणि सगळा ताप
आम्ही शतकानुशतकांचा थंडावा
राखून ठेवला आहे इथे.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
आना तो ऐसे आना
आना तो ऐसे मत आना
जैसे बाड़ा तोड़ घुस आती हैं गायें
और चर जाती हैं
घास, फसलें और फूल.
जैसे आते हैं अंधड़
और गिरा देते हैं औंधा
घर, पेड़, और छप्पर.
जैसे आता है व्यापारी
और हथिया लेता है
जल, जंगल और ज़मीन.
आना तो ऐसे आना
जैसे तराई तक पहुंचते-पहुंचते
शांत हो जाती हैं नदियां.
जैसे अपने गंतव्य पर पहुंचने से पहले
कुछ देर विश्राम करता है
लम्बी और कठिन यात्रा पर निकला यात्री.
पहाड़ों पर जब भी आना
तो बेशक साथ ले आना
अपने सारे ताप, सारी पीड़ाएँ, और सारा ज्वर
हमनें सदियों की शीतलता बचा रखी है यहां .
©Ashok Kumar
अशोक कुमार