🚩
प्रबोधनकारा पोटी
जन्मती करंटी
उचलती ताटी
तोतयाची
खोट्या मांडणीची
करूनी प्रशस्ती
सत्याची नालस्ती
अविरत
घेतले प्रसंगी
तोतयाने सोंग
कल्पनेची भांग
पाजलीसे
इतिहास नाही
कुणाचा गुलाम
कसाई कलम
चालविती
इये महाराष्ट्री
कैक ते पंडित
निपजला जंत
तरी पण
जातीश्रेष्ठत्वाची
मिरवी मिराशी
व्यवस्थाच पोसी
अशी सोंगं
महात्म्याचा खून
मिळाले निमित्त
मराठी मातीत
अराजक
बांधली मनात
तीच खूणगाठ
शेंडीची ती गाठ
आवळली
डूख बाळगून
केलेसे कपट
इतिहास नीट
नासवला
कल्पनेच्या उड्या
मारल्या उदंड
शाहिरीचा कंड
जिरवला
शिवसमाधीचा
केला जिर्णोद्धार
जोतीबांचे थोर
उपकार
शिवचरित्राचा
मांडला बाजार
तेच गा शाहिर
म्हणविती
जिजाऊंची ज्यांनी
केली विटंबना
त्यांची का गणना
शाहिरात?
नव्हते कधीच
इमान सत्याशी
मनुविचाराशी
प्रामाणिक
नाही ही लढाई
व्यक्ती वा जातीशी
छद्म प्रवृत्तीशी
दोन हात
🚩
@भरत यादव
Bharat Yadav