स्वातंत्र्य

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य

१९४७
मुलाने वडिलांना प्रश्न विचारला,

बाबा,हे स्वातंत्र्य म्हणजे काय हो?

मुला,
स्वातंत्र्य खूप मोठी गोष्ट आहे.स्वातंत्र्य मिळालं तर 
आपली गरिबी नष्ट होईल.आपल्याला रोजगार देईल 
आपलं सरकार.आजारपणात सरकार आपणांस सांभाळेल.शिक्षणाची जबाबदारीदेखील सरकारची.
आणि मुला हा जातीभेदसुद्धा मानावा लागणार नाही 
मग कदाचित.

हे काम इंग्रज का नाहीत करत,बाबा?

इंग्रजांना तर सारावसुलीचेच काम ठाऊक आहे पोरा,आपल्यातलेच एखादे सरकार बनले तरच 
आपल्या वेदना कळतील ना!

स्वातंत्र्य इतकी मोठी गोष्ट आहे बाबा?

होय मुला,म्हणून आपणांस स्वातंत्र्यासाठी आपला 
जीव सुद्धा द्यावा लागला तरी मागे हटायला नको.
या स्वातंत्र्यामुळेच आपल्या मुलांचा भविष्यकाळ 
उज्ज्वल होणार आहे.

२०२२
मुलाने वडिलांना प्रश्न विचारला.

पप्पा,स्वातंत्र्य म्हणजे काय?

मुला,आपणांस कुठला लुटणारा पसंत आहे हे निवडण्याचा अधिकारच स्वातंत्र्य होय.

पण पप्पा,ते रोजगार,शिक्षण ,आरोग्य
आणि करापासून सुटका याचे काय?

त्यावर बोलणे म्हणजे देशद्रोह ठरतो,
पोरा.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी लघुकथा
एक लघुकथा

आज़ादी 

1947
बच्चे ने पिता से सवाल किया

बाबा , ये आज़ादी क्या होती है।

बेटा, आज़ादी बहुत बड़ी चीज है। आज़ादी आएगी तो हमारी गरीबी दूर हो जायेगी। हमे काम देगी हमारी सरकार। बीमारी में सरकार हमे संभालेगी। पढ़ाने की जिम्मेदारी भी सरकार की। 
और बेटा ये जाति पाति भी नहीं माननी पड़ेगी फिर तो शायद।

ये काम अंग्रेज क्यों नहीं करते बाबा।

अंग्रेज तो लगान वसूलने का काम जानते हैं बेटा, अपने बीच से कोई सरकार बनेगा वह ही तो जानेगा हमारे दर्द।

आज़ादी इतनी बड़ी चीज है बाबा?

हां बेटा, इसलिए हमें आज़ादी के लिए अपनी जान भी देनी पड़े तो पीछे नहीं हटना चाहिए। इसी आज़ादी से ही हमारे बच्चों का कल अच्छा होगा।

2022
बच्चे ने पिता से सवाल किया

पापा, आज़ादी क्या होती है?

बेटा, हमें कौन सा लुटेरा पसंद है यह चुनने का अधिकार ही आज़ादी है।

लेकिन पापा, वह रोजगार , शिक्षा, चिकित्सा और लगान से मुक्ति का क्या।

उसकी बात करना देशद्रोह कहलाता है बेटा।

©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने