माठ होता मातीचा

माठ होता मातीचा

माठ होता मातीचा

माठ होता मातीचा
आणि देहदेखील मातीचा
स्वातंत्र्याच्या अमृताने पण
विटाळ जाईना जातीचा

टाकी-माठामधले अंतर
निरागसाला माहित नव्हते
मनुवादाचे क्रूर कायदे
निष्पापाला ठाऊक नव्हते
त्याला केवळ तहान माहित
सगळ्यांना जशी लागत असते

त्याला न होते माहित हा
सुवर्णजडीत माठ आहे
स्पर्श करता सोन्याचे
क्षणात जस्त होईल ते
चार घोट पाणी पिल्याने
आयुष्य स्वस्त होईल ते

हिंदू-हिंदू भाऊ-भाऊ
घोषणा बासनात गुंडाळली
बजरंग दल थंड आहेच
शिवसेनासुद्धा थंडावली

बोला बोला माझे बोलणे
कडवट वाटेल,
त्याला इलाज नाही
माठाजवळ पोहोचण्यासाठी
आम्हांला आणखी
किती काळ लागेल 
माहित नाही

माणसं आहोत आम्हीही
हे सत्य कधी स्विकारणार?
कुठंवर जितेंद्रच्या मिशा 
तुमच्या डोळ्यामध्ये खुपणार?
अजून किती असे इंद्र तुम्ही
पाण्यासाठी ठार मारणार?

स्वैर मराठी रूपांतर
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

मिट्टी की थी मटकी और 
मिट्टी की ही थी काया 
लेकिन आजादी का अमृत 
भेद मिटा ना पाया 
टंकी और मटकी का 
अन्तर वो अबोध क्या जाने 
क्या जाने वो मनुवाद के गहरे 
ताने बाने 
उसको केवल प्यास लगी थी 
जो सबको लगती है 
उसको कहां पता था कि यह 
स्वर्ण जड़ित मटकी है 
उसके छू लेने से सोना जस्ता 
हो जायेगा 
चार घूंट पानी से जीवन सस्ता 
हो जायेगा 
हिन्दू हिन्दू भाई भाई मौन 
पड़ा है नारा 
मौन खड़े है शिवसेना और 
बजरंग दल बेचारा 
बोलो बोलो मेरा कहना 
थोड़ा सख्त लगेगा 
मटकी तक आने में हमको 
कितना वक्त लगेगा 
हम भी मानव है पशु नहीं ये 
कब स्वीकार करेंगे 
कब तक जितेंद्र की मूंछ खलेगी 
कितने इन्द्र मरेंगे ?

©राजकुमार बादल
Rajkumar Badal
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने