गंगाजमनी संस्कृतीचे प्रतिक बनलेले
भारतरत्न, शहनाईनवाझ,संगीतकार
उस्ताद बिस्मिल्लाह खाॅं यांचा आज
स्मृतीदिवस, त्यांना विनम्र आदरांजली.
सनईचे दुःख
बनारसच्या गंगाघाटावर
शुचिर्भूत होऊन
मंदिराबाहेर सनई वाजविणारा,
दंतकथा बनलेला वयोवृद्ध
सांगतोय-
पोरा,
अजून शोधतोय असा सूर
जो ऐकून
शत्रूच्या दिशेने तोंड केलेल्या तोफेतला गोळा वितळून जावा आतच
आणि बाहेर निघावा बुद्धाचा
चेहरा घेऊन
समुद्राच्या छातीला चिरत
जाणारी पाणबुडी
मोती होऊन विसावावी शिंपल्याच्या गर्भात आणि तो शिंपला सापडावा एखाद्या प्रेमिकास
वार्यात गर्जना करणारी युद्धनौका
बदलून जावी फेसाच्या बुडबुड्यात
आणि तो फुटावा मुलांच्या पेन्सिललीचे टोक
आणि
वहीच्या मध्ये येऊन
हलकीशी दाढी घेऊन
अस्ताला निघालेला सूर्य
मला जवळ बसवून सांगतो की,
मुला, या वयातदेखील
एकच दुःख सतावतेय मला
अद्यापपर्यंत शोधू नाही
शकलो तो सूर
जो सनईवर वाजवला तर
सीमा अस्वस्थ होऊन उठतील
आणि एकमेकांना अलिंगन देतील
शत्रूच्या डोळ्यांकडे वटारून पाहणारे
लाखो डोळे
बंदूका सोडून परतावेत माघारी
आणि घरी येऊन पाहावे त्यांनी
लेकीच्या डोळ्यांत कसा नाचतोय वसंत
तिरस्काराच्या पाढ्याची आठवण काढणार्याने
हे जाणावे की
सगळ्यात सोपे असते
प्रेमाचे गणित
आणि यात बे दूने पाच चे
पालुपद लावणाराही
येत असतो परिक्षेत अव्वल
बोलणे थोडे पुढे नेत
उस्ताद सांगतात की
भले ते आयुष्य असो
अथवा असो संगीत
सूरात असणे खूप गरजेचे आहे
बेसूर होणे हे
सनईचे सर्वात मोठे दुःख आहे
सनईचे सर्वात मोठे दुःख आहे.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
शहनाई का दु:ख
बनारस के गंगा घाट पर वजू कर
मंदिर के बाहर शहनाई बजाने वाला
किवदंती बन चुका बुजुर्ग कहता है-
बेटा, अभी तलाश रहा हूं ऐसा सुर
जिसको सुन
दुश्मन की तरफ मुंह किए तोप का गोला
पिघल जाए बीच नाल में ही
और बाहर निकले बु्द्ध की शक्ल लेकर
सागर की छाती को चीरता पोत
मोती बन समा जाए सीप के गर्भ में
और वह सीप मिले किसी प्रेमी को
हवा में गर्जना करता जंगी जहाज
बदल जाए झाग के बुलबुले में
और फूटे बच्चे की पेंसिल की नोक और
कॉपी के बीच आ कर
हल्की दाढ़ी लिए अस्त होता सूरज
मेरे को पास बिठा बोलता है-
बेटा इस उम्र में भी
एक ही दुख सालता है मुझे
अभी तक नहीं ढूंढ पाया हूं वह सुर
जिसको शहनाई पर बजाऊं
तो सीमाएं बेचैन हो उठें
और कर लें आलिंगन एक दूसरे का
दुश्मन की आंखों को घूरती लांख आंखें
बंदूक छोड़ लौट जाएं वापस
और घर पहुंच देखें
बेटी की आंखों में कैसे नाचता है बसंत
नफरत का पहाड़ा याद करने वाला
यह जान जाए कि
सबसे आसान होता है
प्रेम का गणित
और इसमें दो दूनी पांच रटने वाला भी
आता है परीक्षा में प्रथम
बात को थोड़ा आगे बढ़ाते
उस्ताद जी कहते हैं-
वह चाहे जीवन हो या संगीत
सुर में रहना बहुत जरूरी है
बेसुरा होना
शहनाई का सबसे बड़ा दुख है
शहनाई का सबसे बड़ा दुख है।
©Kumar Krishan Sharma
कुमार कृष्ण शर्मा
[भारत रत्न बिस्मिल्लाह खान की आज 21 अगस्त को उनकी पुण्यतिथि पर उन्हें इस कविता के बहाने याद ]
सुनील यावलीकर
Artist
Sunil Yavlikar