सकाळ सकाळी माझ्या घरी छापा पडला
पेन्शनविषयक कागदपत्रे
संभाव्य संकटकाळ आणि
मुलांसाठीचा भविष्य निर्वाहनिधी म्हणून जमा असलेल्या
पाच पाच लाखांच्या दोन खात्यांशिवाय काय होते माझ्याजवळ?
तरीही कार्यवाही चालली
पूर्ण दिवस आणि रात्रभर
माझ्याविरूद्ध
रितसर एक चार्जशीट तयार
केले गेले
पुढील मुद्यांनुसार-
की माझ्या खिशात मिळून आल्यात पाच-पाचशेच्या नोटा तब्बल तीस हजाराच्या
वस्तुतः माझे मासिक पेन्शन आहे एकूण पंचवीस हजार
की बाॅयकाॅट असूनदेखील माझ्या खिशात मिळून आले लालसिंग चढ्ढा या सिनेमाचे अर्धे तिकिट
पण
टॅक्स फ्री असलेला काश्मिर फाईल्स चित्रपट मी पाहिला नाही
की माझ्या पुस्तकांच्या कपाटामधून मिळाले आहे आक्षेपार्ह साहित्य
इक्बाल,फैज,मंटो,भगतसिंग यांचे ग्रंथ
गांधीजींचे चरित्र,भारत एक शोध
या उलट
राष्ट्रनिर्माते वीर सावरकर,
दीनदयाळ उपाध्याय,कुशाभाऊ ठाकरे यांचे एकसुद्धा पुस्तक मिळाले नाही
की दर्शनी भागात ठेवण्यात आल्या होत्या
सूरदास मीरा
नंदराय यांच्या कविता
गीता-रामायणासोबत
पण याच्यात सामील आहे
मुस्लिम कवी रहीम रसखान
आमिर खुस्रो यांचे साहित्य
रामाविषयीचा माझा विचार यासाठी
संशयास्पद मानण्यात आला
की राममंदिराच्या उभारणीसाठी मी वर्गणीची पावती
नाही फाडली
मी अटकेत
माझ्या जवळसुद्धा फिरकला नाही
कुठल्याही वृत्त वाहिन्यांचा
कुणी वार्ताहर
किंवा
एखाद्या वर्तमानपत्राचा कुणी बातमीदार
तरी देखील
टिव्ही वाहिन्यांवर
झळकत राहिली ब्रेकिंग न्यूज
वृत्तपत्रात छापून आले
की सकाळ सकाळी माझ्या घरी
छापा पडला.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
मेरे घर छापा पड़ा
सुबह-सुबह मेरे घर छापा पड़ा
पेंशन संबंधी काग़जात
गाढ़े वक़्त और बच्चों के भविष्य के लिए सावधि-जमा
पाँच-पाँच लाख के दो खातों के सिवा
क्या था मेरे पास
फिर भी कार्रवाई चली पूरा दिन सारी रात
बाक़ायदा एक चार्जशीट तैयार की गई मेरे ख़िलाफ़
निम्न बिंदुवार-
कि मेरी जेब में मिले पाँच-पाँच सौ के नोट पूरे तीस हजार
जबकि मेरी मासिक पेंशन है कुल पच्चीस हजार
कि बॉयकॉट के बावजूद मेरी जेब में पाया गया फ़िल्म लालसिंह चड्डा के शो का आधा टिकिट
जबकि मनोरंजन-कर से मुक्त मैंने देखी नहीं
कश्मीर फाइल्स
कि मेरी क़िताबों की शेल्फ से बरामद हुआ आपत्तिजनक साहित्य
इक़बाल, फ़ैज़, मंटों,भगतसिंह की क़िताबें
गाँधी की जीवनी भारत एक खोज
जबकि राष्ट्रनिर्माता वीर सावरकर दीनदयाल उपाध्याय कुशाभाऊ ठाकरे की नहीं मिली एक भी क़िताब
कि शीर्ष पर रखा था सूर मीरा नंदराय का कवित्त गीता-रामायण के साथ
मगर इनमें शामिल है मुस्लिम कवि
रहीम रसखान अमीर ख़ुसरो का साहित्य
कि राम को लेकर मेरी सोच इसलिए संदिग्ध मानी गई
कि राममंदिर निर्माण हेतु मैंने चंदे की रसीद नहीं कटाई
मैं गिरफ़्तार
मेरे पास तक नहीं फटका
किसी टीवी समाचार चैनल का कोई संवाददाता
किसी अख़बार का कोई पत्रकार
हालाँकि टीवी चैनलों पर छायी रही ब्रेकिंग-न्यूज़
अख़बारों में छपा
कि सुबह-सुबह मेरे घर छापा पड़ा
©Vasant Sakargaye
वसंत सकरगाए