आजकालचे अभंग

आजकालचे अभंग

आजकालचे अभंग
🇮🇳
राष्ट्रध्वजाचाही
चालला व्यापार
धूर्त नफेखोर
चटावले

दिखाऊपणाची
कोण चढाओढ
ब्रिटिशांची भाड
खाल्लेल्यात

घरोघरी म्हणे
झेंडा फडकवा
आणिक दाखवा
देशभक्ती

ज्यांनी जन्मभर
पोसला मत्सर
तिरंग्याशी वैर
बाळगले

त्यांच्यावर आज
काय आली वेळ
उगवतो काळ
सूड ऐसा

देश विकताना
गवसली युक्ती
सक्तीतून भक्ती
सिद्ध व्हावी

गोरगरिबांची
करू नका गय
दलालांची सोय
पाहा फक्त

राष्ट्रप्रेम असे
वाहे ओसंडून
देशाचे दुश्मन
भारावले

झेंड्यातून ऐसी
घडावी बा क्रांती
फितुरांची वृत्ती
पालटावी

भेदाभेद भ्रम
जळूनिया जावो
भारताची राहो
मान उंच
🇮🇳
    -भरत यादव
Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने