बहिणींचे मला दररोज स्मरण
होत नाही
जसे स्मरत नसते जगात
आपले असणे
जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान
एक पूल बनविण्यासाठी अविरत
श्वास घेणे
बहिणी मला आठवतात सणासुदीला
देवी आणि देवतांप्रमाणे
सकाळ सकाळी एखाद्या अनुष्ठानाप्रमाणे
त्यांची करत असतो विचारपूस
पुनरूक्ती करतो खूप सार्या गुळगुळीत वाक्यांची
नमस्कार-चमत्कार घडतो त्यांच्या कुटुंबकबिल्याबरोबर
आणि मग बहिणी फुलारून येतात,
भरून पावतात
प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरादाखल
ऐकायला येते त्यांचे खळखळून हसणे
त्या कुठली तक्रार नाहीत करत
आपल्या घर कुटुंब आणि आयुष्याविषयी
त्या जाणतात की
सूर्यापासून वेगळे झाल्यानंतर
केवढे महदांतर पडत जात असते
सौरमंडळातल्या ग्रहांमध्ये
सर्वांना फिरणे भागच असते
आपल्या परिक्रमेनुसार
आपापल्या कक्षेत
गोल गोल
त्या मोठमोठाले हट्ट करीत
नसतात भावापुढे
पुनःपून्हा नकार देतात काहीही स्विकारण्यास
त्यांना नको असते की
कुणालाही माहित पडावे हे गुपीत
की भावाच्या झोळीत देण्यासाठी काहीही नाहीये गोड शब्दांशिवाय
त्यांना वाटत नाही बंधूराजाच्या डोळ्यात दिसावीत
असहाय्यतेची आसवे
त्या क्षणी त्यांच्यात प्रवेशतो
आईचा आत्मा
बंधू आणि त्याच्या कुटुंबाकरिता
अनंत आशिर्वाद देताना
त्या भूमिका बदलून
नकळतपणे सांभाळून येतात
वृद्ध मातापित्यांना
त्यांना ऐकवत असतात
भावाच्या व्यग्रतेच्या
खोट्यानाट्या कथा
त्या घरातल्या कुठल्याशा कोपर्यात
शोधत असतात आपला भूतकाळ
ज्याला त्या ठेवून विसरून
गेलेल्या होत्या
सुवर्णमुद्रांप्रमाणे
त्या क्षणी
भागिरथी होऊन जातात बहिणी
बहिणींनो,
आज प्रेम आणि आदरपूर्वक
आठवतोय तुम्हाला
सोबत घेतलेल्या त्या
प्रगाढ विश्वासाला
जो तुम्ही गुपचूप टाकला होता
माझ्या रिकाम्या खिशात
अनमोल नाण्याप्रमाणे
तुमचे असणे हीच शाश्वती आहे
सूर्य आणि आकाशगंगा यांच्यातल्या
संबंधांची.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
बहनें
बहनें मुझे रोज़ याद नहीं आतीं
जैसे याद नहीं आता दुनिया में अपना होना
जीवन और मृत्यु के बीच
एक पुल बनाए रखने के लिए
लगातार साँस लेना।
बहनें मुझे याद आती हैं त्यौहारों पर
देवियों और देवताओं की तरह
सुबह-सुबह एक अनुष्ठान की तरह
उनसे पूछता हूँ उनके हाल-चाल
दोहराता हूँ कुछ बहुत घिसे-पिटे वाक्य
प्रणाम, नमस्कार होता है उनके परिवारजनों से
और बहनें फूल कर कुप्पा हो जाती हैं।
हर प्रश्न के उत्तर में
सुनाई देती है उनकी खिलखिलाहट
वे कोई शिकायत नहीं करतीं
अपने घर परिवार और ज़िन्दगी के बारे में
वे जानती हैं सूर्य से अलग होने के बाद
कितनी विशद दूरी होती है सौरमण्डल के ग्रहों में
सबको घूमना ही होता है अपनी परिक्रमा में
अपनी अपनी धुरी पर घूमते हुए।
वे बड़े-बड़े आग्रह नहीं करती भाई से
बार-बार मना करती हैं कुछ भी लेने से
वे नहीं चाहतीं
कोई भी जान पाए यह राज़
कि भाई की झोली में
देने को कुछ भी नहीं है
मीठे बोलों के सिवाय।
वे नहीं चाहतीं भाई की आँखों में दिखें
विवशता के आँसू
उन क्षणों में उनमें प्रवेश कर जाती है
माँ की आत्मा
भाई और उसके परिवार पर
लुटाते हुए असंख्य आशीर्वाद।
वे बदल कर भूमिका
चुपचाप सँभाल आती हैं
बूढ़े माता-पिता को
झूठ-मूठ सुना देती हैं
उन्हें भाई की व्यस्तता की कहानियाँ
वे घर के किसी कोने में
ढूँढ़ती हैं अपना अतीत
जिसे वे रख कर भूल गई थीं
स्वर्ण-मुद्राओं की तरह।
उन क्षणों में
भगीरथी हो जाती हैं बहनें।
बहनों,
आज स्नेह और सम्मान से
याद कर रहा हूँ तुम्हें
साथ में लिए हुए उस विश्वास को
जो तुमने चुपके से डाल दिया था
मेरी खाली जेब में
क़ीमती सिक्के की तरह।
तुम्हारा होना ही आश्वस्ति है
सूर्य और आकाशगंगा के सम्बन्धों की !
©राजेश्वर वशिष्ठ
Rajeshwar Vashistha