चिंता

चिंता

चिंता

माझ्या वडिलांचा मृत्यू
शंभर वर्षे जगल्यानंतर झाला
आजोबाही तितकीच वर्षे जगले
मी आईला विचारत असतो,
मी ही तितका जगू शकेन 
का गं?

ती हसते
म्हणते, तू म्हातारा नाही झालास
ना तुझी आई
ना कधी लेक म्हातारा होत असतो,
ना कधी आई
आपण दोघे तरूण आहोत
मग मृत्यूची चिंता कशाला रे?

खरोखर तिचं बोलणं ताजेपणा
देतं
हरभरे फोडणारे तिचे दात दिलासा देत असतात की
आमचे आयुष्य अजून दीर्घ आहे

मी पकडून ठेवतो आईच्या हातांना
जणू तिला कधी जाऊ देणार नाही
इतकेसे प्रेमसुद्धा तिला रडवते
जणू काही तिला स्वतःची चिंता नाहीये,
फक्त माझ्या दीर्घ आयुष्याची!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

चिंता

मेरे पिता की मृत्यु
सौ वर्ष जीने के बाद हुई
दादा भी उतने ही वर्ष जिये
मैं मां से पूछता हूं
क्या मैं भी उतना जी लूंगा

वह हंसती है
कहती है तुम बूढ़े नहीं हुए
न ही तुम्हारी मां
न कभी बेटा बूढ़ा होता है, न कभी मां
हम दोनों जवान हैं
फिर मौत की चिंता क्यों

सचमुच उसकी बातें ताजगी देती हैं
उसके चने चबाते दांत आश्वस्त करते हैं
हमारी उम्र अभी लंबी है

मैं थाम लेता हूं मां को हाथों में
जैसे उसे कभी जाने नहीं दूंगा
इतना सा प्रेम भी उसे रुला देता है
जैसे उसे अपनी चिंता नहीं
केवल मेरी लम्बी उम्र की!

 ©नरेश अग्रवाल
Naresh Agrawal

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने