बुद्ध हसलेत.

बुद्ध हसलेत.

बुद्ध हसलेत

बुद्ध तेव्हा तेव्हा रडत असतात
जेव्हा जेव्हा त्यांच्या लेकी-बाळींना
गर्भात मारले जाते
जेव्हा ही त्यांचे आॅनर किलिंग होते
जेव्हा ती हुंड्यासाठी जाळली जाते
जेव्हा-जेव्हा त्यांच्यावर बलात्कार होतात
जेव्हा ही त्यांची स्वप्ने चिरडली जातात
जेव्हा- जेव्हा त्यांना अपमानीत केले जाते
जेव्हा त्या उपाशी झोपी जातात
जेव्हा-जेव्हा त्या फुलण्याआधीच तुडविल्या जातात
जेव्हा ही त्यांचे भरारी मारणारे पंख कापून टाकले जातात
पोखरण अणुस्फोटानंतर बुद्ध रडले होते
आज तथागत हसले आहेत
आज त्यांच्या एका लेकीने 
त्यांच्या खांद्यावर चढून विशाल आकाशात झेपावलीय
चंद्रतार्‍यांना स्पर्श करण्यासाठी
अवघ्या सृष्टीला आपल्या तळहाती 
पेलून धरण्यासाठी
आज बुद्ध हसलेत
या आपण सारे हसू या
आपण सगळेजण आपल्या
लेकींना आपापल्या खांद्यावर चढू देऊ
त्यांना असीम आकाशात भरारी मारू देऊ.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

बुद्ध मुस्कुराए

   बुद्ध तब-तब रोते हैं
   जब-जब उनकी बेटियों को गर्भ में मारा जाता है
   जब भी उनकी ऑनर किलिंग होती है
   जब वे दहेज के लिए जला दी जाती हैं
   जब-जब उनके साथ बलात्कार होता है
   जब  भी उनके सपनों को रौंदा  जाता है
   जब-जब उन्हें अपमानित किया जाता है
   जब भी वे भूखी सोती हैं
   जब-जब वे खिलने से पहले ही कुचल दी जाती हैं
   जब भी उनके उड़ान भरने वाले पंख काट दिए जाते हैं
   पोखरन बम विस्फोट के बाद  बुद्ध रोए थे
   आज बुद्ध मुस्काराए
   आज उनकी एक बेटी ने
   उनके कंधों पर चढ़ विस्तृत आकाश में उड़ान भरा
   चांद-तारों को छूने के लिए
   सारी सृष्टि को अपनी हथेली पर रख लेने के लिए
   आज बुद्ध मुस्काराए   
   आइए हम सब मुस्काराएं
   हम सब अपने बेटियों को
   अपने-अपने कंधों चढ़ने दें
   उन्हें विस्तृत आकाश में उड़ान भरने दें

©सिद्धार्थ रामू
Siddharth Ramu 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने