कुजबुजब्रिगेडचा तीळपापड

कुजबुजब्रिगेडचा तीळपापड

कुजबूजब्रिगेडचा तीळपापड

नाक रगडून ब्रिटीशांपुढती
माफी मागितली तरी,
सदाशिवपेठी चित्पावनी
शेडा वरतीच सावरकरी

म्हणे, कुठल्या चॅनेलवरती
अपमान घोर घडला आहे
निवेदक-पत्रकारांना तेथील
द्वेषव्याधी जडला आहे!

उपमर्द घडता थोरांचा,मग
समान निषेध व्यक्त व्हावा
राष्ट्रपित्याचा नित्य अपमान
डोळे फाडून का गप्प सहावा?

संघीष्ट झालेत पुष्ट म्हणून का?
वाणी कर्कश्श अन् आवाज चढा
कर्तृत्वशून्य जे स्वातंत्र्यसंग्रामी
शिकवू पाहती नवराष्ट्रवादधडा

कुत्सित कोट्या अन् अवहेलना
हीच टीकेची का बा हीन तर्‍हा
खुनी नथुराम्याचा अजूनि पुळका
गांधीजीद्वेष्टी ही कुविचारधारा

सनातनी चिखल पसरला
कट्टर कर्मठ रान माजले
हाती सत्तेचे दोर आले अन् हे
संविधानाहूनही महान झाले!!

पुराणातली वाणगी देती 
जनमनाला नेती भुलवत
आज-उद्याची ना फिकीरपर्वा
जुनाट उकिरडे हिंडती हूंगत

जातनिष्ठेपरी कधीही राष्ट्रनिष्ठा भारी रे
धर्माभिमानापेक्षाही मानवताच खरी रे

           भरत यादव,
             सोलापूर
             
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने