तुमचा राजा

तुमचा राजा

तुमचा राजा

तुमचा राजा कुणीही का असेना
त्याने फरक नाही पडत तसूभरही
कारण डोक्यावर त्याच्या 
कुठल्या ना कुठल्या
भृगु,वशिष्ठ वा सांदिपनीचा हात
आणि आशिर्वाद असतो

काय येईल तुमच्या वाट्याला
हे ठरविण्याचा अधिकार
नसतो तुमच्या राजाजवळ
हे ही भृगु,वशिष्ठ किंवा
सांदिपनीच ठरवत असतात

आपल्या हक्क आणि प्रतिष्ठेसाठी
जेव्हा केव्हाही तुम्ही मान वर काढाल
तेव्हा भृगु,वशिष्ठ वा सांदिपनी हेच
ठरवतील की तुमची मान
वाचवायची की छाटून टाकायची

भृगु,वशिष्ठ आणि सांदिपनी
इथपर्यंत ठरवतील की
तुम्ही माणूस राहणार की
त्या परीघाबाहेर !

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

तुम्हारा राजा

कोई भी हो तुम्हारा राजा
इससे फ़र्क नहीं पड़ता तनिक भी
क्योंकि सिर पर उसके
किसी न किसी 
भृगु, वशिष्ठ या संदीपनी का हाथ 
और आशीर्वाद होता है 

क्या आएगा तुम्हारे हिस्से में
यह तय करने का अधिकार
नहीं होता है तुम्हारे राजा के पास
यह भी भृगु, वशिष्ठ अथवा
संदीपनी ही तय करते हैं

अपने हक और सम्मान के लिए 
जब कभी भी तुम उठाओगे गर्दन
तब भृगु, वशिष्ठ या संदीपनी ही
तय करेंगे कि तुम्हारी गर्दन
बचे या कलम कर दी जाए

भृगु, वशिष्ठ और संदीपनी 
यहां तक तय करेंगे कि 
तुम मनुष्य रहोगे 
अथवा उसकी परिधि से बाहर!

©राम बचन यादव
Ram Bachan Yadav

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने