किती हाणावेत जोडे?

किती हाणावेत जोडे?

किती हाणावेत जोडे?

किती हाणावेत जोडे
किती उगारावी चप्पल
नथ्थुच्या पिलावळीला
येणार नाही अक्कल

देशाच्या स्वातंत्र्यासाठी
जे लढले,हुतात्मा झाले
बलिदानातून त्यांच्याच
स्वराज्य साकार झाले

सांगा काय योगदान
देशउभारणीत दिले?
माफीखोर पेन्शनखाऊ
बापजादे तुमचे सगळे

गांधी-नेहरू तुमच्या
का डोळ्यांमध्ये खुपती
देशासाठी त्यांनी केली
स्व-आयुष्याची माती

देशबुडव्या फितुरांनो
तुमचे राष्ट्रप्रेम खोटे
सच्च्या देशभक्तांनावे
मोडत बसती बोटे

भारताची एकसंधता
तुम्हांस बघवत नाही
विविधतेतील एकतेचे
मर्म ही उमजत नाही

सौहार्दाच्या वैर्‍यांनो रे
कितीही आपटा बुड
गंगाजमुनी संस्कृतीचा
प्रवाह वाहे अखंड!

         @भरत यादव
      Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने