भारताचा इतिहास

भारताचा इतिहास

भारताचा इतिहास एक कसा काय असू शकतो?

भारताचा इतिहास एक कसा काय असू शकतो? 
भारताचे तर अनेकानेक इतिहास असतील.
राजे-महाराजांचा एक इतिहास असेल.
त्यांच्या दास-गुलामांचा दुसरा इतिहास असेल.
सावकार-महाजनांचा एक 
इतिहास असेल.
मजूरांचा दुसरा इतिहास असेल.
एक ब्राह्मणांचा इतिहास असेल,
दुसरा दलितांचा इतिहास असेल.

तुम्ही जे म्हणत असता ना की 
हा भारतीय इतिहास आहे आणि 
आपण मग त्यात राजेमहाराजे आणि ब्राह्मणांसाठी लिहीले गेलेले ग्रंथ 
जसे की वेद वा गीता यांचीच बात करून इतिहासावरची पूर्ण चर्चाच संपवून टाकत असता,

ही एकाच इतिहासात सगळ्यांना गुंडाळण्याची खरेतर तुमची एक चलाख चाल असते.
अशा प्रकारची भारताची एकचएक परंपराही नाहीये.

तुम्ही जे सांगता ना की ही 
आपली भारतीय परंपरा आहे!
अशी कुठली एक परंपरा 
असतच नाही,

भारतातील लाखो जातीसमूहांच्या आपापल्या वेगवेगळ्या परंपरा आहेत.
राजेमहाराजे आणि ब्राह्मणांच्या परंपरांना भारतीय परंपरा मानणे म्हणजे भारतातील आदिवासी, कष्टकरी जाती, शेतकरी यांच्या परंपरांना नष्ट करणे 
आणि त्यांना आजदेखील दुय्यम
मानण्यासारखेच आहे.

ज्यामुळे ते सद्याच्या राजकारणात आणि आजच्या नविन अर्थिक धोरण वा प्रक्रियेत सहभागी होऊ नयेत.

यामुळेच हे संघवादी
जेव्हा
भारतीय परंपरा,
भारतीय इतिहास
आणि भारतीय संस्कृती यांच्या
मोठमोठ्या गोष्टी सांगायला लागतील
तेव्हा त्यांना विचारा
की,
तुम्ही कुठल्या भारताबद्दल बोलत आहात?

दरोडेखोर राजे आणि ब्राह्मणांच्या भारतीय संस्कृतीविषयी 
की 
कष्टकरी आमजनतेचा इतिहास आणि त्यांच्या श्रमसंस्कृतीविषयी??
                                              

मूळ हिंदी टिपण
हिमांशु कुमार
Himanshu Kumar

मराठीकरण
भरत यादव
Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने