मेहरून्निसा यांचा गणपती

मेहरून्निसा यांचा गणपती

मेहरून्निसा यांचा गणपती

दोन्ही हात जोडून मेहरून्निसा परवेझ यांनी 
गणेश चतुर्थी साजरी केली
हार्दिक शुभेच्छा का देतायत यासाठी का की 
त्यांना सांगितले गेले आहे
हा तुमचा उत्सव नाहीये 
हा तुमचा देव नाहीये म्हणून!

दोन्ही हात जोडून
मेहरून्निसा परवेझ 
गणपती देवाकडे काय मागतायत,
बिल्किस बानोची वा स्वतःची खुशाली
किंवा त्यांना मुस्लिमांच्या घरांची काळजी वाटतेय का, 
ज्यांना बुलडोझ 
केले जाऊ शकते.

काय मेहरून्निसा परवेझ 
कट्टर हिंदू भक्तांना हे सांगू पाहतायत
का की, 
तुम्ही ईदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्यासाठी उतावीळ होत आहात आणि पाहा मी
तुमच्या दैवताला आपल्या घरात
कसे फुला-पानांनी सजवले आहे!

काय सिद्ध करू पाहतायत
मेहरून्निसा परवेझ की 
हे जग हृदयशून्य नाहीये
काय लोकांची विचार करण्याची पद्धती त्या बदलू इच्छित आहेत?
किंवा जगण्याची रीत शिकवताहेत?

कुठल्याही श्रद्धापद्धतीवर सर्वांचा हक्क आहे असे तरी
मेहरून्निसा सांगू बघताहेत का?
किंवा माणुसकी ही धर्मापेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगण्याच्या गुप्त प्रयत्न तरी त्या करीत नसाव्यात?

कुठल्याही धर्माच्या व्यक्तीने त्यांना अनोळखी आणि शत्रू समजू नये,
असे तरी त्यांना वाटत नसावे?

मी तर खूप लहानपणापासून त्यांच्या कथा वाचत आलोय,
आता मी त्यांना हात जोडलेले
पाहातो आहे

घरामध्ये गणेशोत्सव साजरा करून धर्मातील फुटपाड्या शक्तीला दुर्बल करू पाहतायत का मेहरून्निसा?

हे गणेशा,
त्यांना शक्ती दे
दीर्घायुष्य दे
शांतचित्त मन दे
ज्यामुळे उरल्या सुरल्या आयुष्यात 
त्या जे लिहू पाहतील लिहू शकाव्यात
आणि मी ते वाचू शकेन.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

मेहरून्निसा के गणेश 

दोनों हाथ जोड़कर मेहरून्निसा परवेज़ गणेश चतुर्थी की 
हार्दिक शुभकामनाएं क्यों दे रही हैं क्या इसलिए कि उनसे कहा गया है 
ये तुम्हारा पर्व नहीं है ये तुम्हारे देवता नहीं हैं

दोनों हाथ जोड़कर मेहरून्निसा परवेज़
गणेश जी से क्या मांग रही हैं बिलकिस बानो की या अपनी खैरियत
या उन्हें उन मुसलमानों के घर की चिंता हो रही है
जिन्हें बुलडोज किया जा सकता है

क्या मेहरून्निसा परवेज़ उग्र हिंदू भक्तों को बताना चाहती हैं
कि तुम ईदगाह मैदान में गणेशोत्सव मनाने को मतवाले हो रहे हो
और देखो तुम्हारे ईश्वर को मैंने अपने घर में कैसे फूल पत्तियों से सजाया है

क्या साबित करना चाहती हैं मेहरून्निसा कि दुनिया ह्रदयहीन नहीं है 
क्या वे लोगों के सोचने का तरीका बदलना चाहती हैं
या जीने का तरीका सिखा रही हैं  

किसी भी विश्वास पद्धति पर सबका हक है
क्या मेहरून्निसा ये कहना चाहती हैं
कहीं वे इंसानियत को धर्म से श्रेष्ठ बताने की 
गुप्त कोशिश में तो नहीं लगी हैं

क्या वे ये चाहती हैं कि किसी भी धर्म का आदमी 
उन्हें अजनबी और दुश्मन न समझे

मैं तो बहुत छोटी उम्र से उनकी कहानियां पढ़ता आया हूं
अब मैं उन्हें हाथ जोड़े ये करता देख रहा हूं

क्या घर में गणेशोत्सव मनाकर
धर्म की विभाजनकारी ताकत को कमजोर करना चाहती हैं मेहरून्निसा

हे गणेश, उन्हें शक्ति दो लंबी उम्र दो शांत मन दो
कि बचे खुचे जीवन में जो वे लिखना चाहें लिख सकें
और मैं उसे पढ़ सकूं.

©Amitabh Bacchan
अमिताभ बच्चन 

पद्मश्री मेहरून्निसा परवेझ या 
ज्येष्ठ आणि प्रसिद्ध हिंदी लेखिका आहेत.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने