बायकांचं आभार कोण मानतं

बायकांचं आभार कोण मानतं

बायकांचं आभार कोण मानतं..?

कवी,
तू सांगितलं होतंस
विचारावंस नदीला
की तू कशी आहेस..!!

ऐक ना कवी,
पूलावरून जाताना
एक दिवस
विचारून घेतलंच मी
नदी गं,कशी आहेस तू..?

कितीतरी खडबडीत दगडांना 
कोरलं आहेस तू
स्वतः हरपण्याआधी
कितीतरी वेदनांना
शोषलं आहेस,
वाहून आणलं आहेस.....
किती तृषार्तांची तहानदेखील
भागवली आहेस
आभार मानलं आहे कुणी?

निर्मळपणे हसत हसत
पुटपुटली नदी
तू ही ना.......
बायकांचं आभार कोण मानतं...?


मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

कवि
तुमने कहा था
पूछना नदी से
कि तुम कैसी हो...!!

सुनो न कवि, पुल से गुजरते हुए 
एक दिन
पूछ ही लिया मैंने 
नदी तुम कैसी हो...?

कितने ही खुरदुरे पत्थरों को तराशा है तुमने
ख़ुद को खोने से पहले
कितनी ही पीड़ाएँ 
सोखी हैं, बहाई हैं ....
कितने प्यासों की प्यास भी बुझाई है
शुक्रिया अदा किया किसी ने?

निर्मल मुस्कान लिए 
बुदबुदाई नदी
तुम भी न.......

स्त्रियों का शुक्रिया कौन अदा करता है....?

©अमनदीप " विम्मी "
Amandeep Gujral
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने