बा महाराष्ट्रा

बा महाराष्ट्रा

बा महाराष्ट्रा!
🚩
निष्ठा निजली दिल्लीखालती
दिल्लीपती निव्वळ गुजराती
फितुरीची किड महाराष्ट्राला
नासवली त्यांनी मराठी माती

स्वाभिमान मेला थिजली मती
इतिहास विसरती थांबली गती
स्वार्थासाठी केला आईचा सौदा
लाचार बाजारू वृत्ती खुर्चीवरती

धर्मअफूने बा समाज खंगला
सनातन्यांनी मग डाव साधला
क्षुद्र खोक्यांनी गळा आवळला
नीच-निर्लज्जांची नागवी युती

मराठी समशेर जिथे तळपली
कधीकाळी जी सूरत लूटली
तिथेच जाऊन नाक रगडती
नकटे मिंधे व्यापार्‍यांपुढती

मुलूख मराठी शरमिंदा केला
शेंदाडसेनेचा स्वाभिमान मेला
पेशवाईचे अभय शिंदेशाहीला
दिल्लीचे जोखड छाताडावरती

जरीपटका फडकतो मुंबईवरती
समुद्र सांगतो-गातो दिगंत किर्ती
हक्क पहिला तीवर महाराष्ट्राचा
सोपवणार ना कधी भुरट्याहाती

मजूर शेतकरी उद्धवस्त झाला
रोजगाराचाही हक्क हिरावला
बिनकण्याचे न-नेते निपजती
जनतेच्या जे बोकांडी बसती

सह्याद्रीची हाक कधी ऐकणार?
बा महाराष्ट्रा कधी पेटून ऊठणार?
धमण्यातले रक्त कधी उसळणार?
कधी झुगारणार ती अंधभक्ती?
🚩
                             -भरत यादव
                       Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने