🚩
धर्मसंसदेत
फुंकती बा शंख
सनातनी डंख
मारताती
हरिद्वार जणू
भगवा आखाडा
मारा आणि तोडा
किंचाळती
वैदिकांची मती
भ्रष्ट झाली आता
संविधान सत्ता
खुपतसे
सहिष्णु राष्ट्राचे
करूनी पतन
करती जतन
थोतांडाचे
भटभिक्षुकांचा
पिसाळला तांडा
भकलती तोंडा
येई जे जे
मुर्ख जोगड्यांचा
नागडा तमाशा
ढोल आणि ताशा
बडवती
सत्ताधारी झाले
धर्माचे गुलाम
खेचते लगाम
कर्मठता
उन्मादाच्या पोटी
राष्ट्राच्या बोकांडी
गणंगांच्या झुंडी
निपजती
धर्मश्रेष्ठत्वाची
अफू फार थोर
भूकेचाही घोर
मिटविते!
संविधानापुढे
नाही कुणी श्रेष्ठ
ठेवा ध्यानी गोष्ट
सर्वांनीच
🚩
©भरत यादव
Bharat Yadav