त्याला सुरूवातीपासूनच पुस्तकांमध्ये
जाणे पसंत होते,
मंदिरांच्या दारावर
डोके आपटून पवित्र होणे नव्हे,
गुलाब अजूनही मित्र बनणे पसंत करतो
कुण्या राजासाठी अत्तर होणे नव्हे.
सत्ताधुंद राजा भिंती चढवून चढवून मरून गेला
त्याला ठाऊक असायला हवे होते
की सद्यकाळाचे वारे
त्या गुलाबासोबत आहे
वारे प्रत्येक काळात थोडेफार बंडखोर राहिले आहे
हुकूमशहांची राजवट पालटत राहिले आहे
कुपींमध्ये बंद असलेल्या अत्तराच्या स्वातंत्र्यासाठी
निरंतर कार्य करीत राहिले आहे
राजाची हाडं
आता कंपोस्ट खतामध्ये रूपांतरीत झाली आहेत
त्याच्यावर उमलले आहेत
खूप सारे गुलाब
खरेतर राजा आत्ता कुठे मेला आहे
या ओझ्याने दबून मेलाय,
या कलमी रोपट्यांवर उगवलेल्या
गुलाबाच्या नाजूक पाकळ्यांना स्पर्शून मेलाय...
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
गुलाब की आजादी
उसे शुरू से ही किताबों के बीच जाना पसंद था
मंदिरों की चौखट पर
सिर पटक कर पवित्र होना नहीं
गुलाब अब भी मित्र बनना पसंद करता है
किसी राजा के खातिर इत्र होना नहीं
नक चढ़ा राजा दीवार उठाते उठाते मर गया
उसे मालूम होना चाहिए था
कि इस जमाने की हवाएं
उस गुलाब के साथ हैं
हवाएं हर दौर में थोड़ी बगावती रही हैं
तानाशाहों की सेज पलटती रही हैं
बोतलों में कैद इत्र की आजादी के लिए
निरंतर काम करती रही हैं
राजा की हड्डियाँ
अब जैविक खाद में तब्दील हो चुकी हैं
उसी के ऊपर उग आये हैं
ढेर सारे गुलाब
असल में राजा अब जाकर मरा
इस बोझ से दबकर मरा
इस कलमी पौधे में उगे
गुलाब की कोमल पंखुड़ियों को छूकर मरा....
©बच्चा लाल 'उन्मेष'
Bachcha Lal Unmesh