भिऊ नका अशा कायद्याला
जो स्त्रीला संपत्ती आणि
पुरुषाला तिचा मालक बनवतो
भिऊ नका त्या धर्माला
जो एकाला श्रेष्ठ
आणि दूसर्याला शूद्र ठरवतो
भिऊ नका अशा समाजाला
जो धर्म,जात,लिंग यावर आधारीत
उतरंड निश्चित करतो
भिऊ नका अशा व्यवस्थेला
जिथे एक शोषक बनून रक्त शोषतो
आणि
दूसरा शोषित होऊन गुलामी
करण्यासाठी शापित असतो
भिऊ नका त्या हुकूमशहाला
जो हिरावून घेतो तुमच्यापासून
तुमच्या जीभा आणि
मणक्याचे हाड तसेच
योग्य ते योग्य आणि
चूकीचे ते चूक म्हणण्याचे स्वातंत्र्य
पण त्या बाईला अवश्य भिऊन राहा
जी इराणमध्ये नाचत नाचत
आपला हिजाब जाळते आहे
याच बायका पितृसत्तेच्या ताबूतात
अखेरचा खिळा ठोकू शकतात
या नष्ट करतील प्रत्येक गैर प्रथा
या ज्यांची ओळख
कुणाची आई,
कुणाची बहिण आणि
कुणाची लेक असा आणि
इतकीच आहे
आता मूठीत कोंडतील
तुमचा उद्याच्या सकाळचा सूर्य
माझे ऐका यांच्यापासून सावध राहा
या पुढे सरसावतील तेव्हा यांना वाट द्या
कारण आता यांच्या वाटेवरील
प्रत्येक अडथळ्याचा निःपात होण्याची वेळ
येऊन ठेपली आहे...
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
मत डरो ऐसे कानून से
जो हव्वा को सम्पत्ति और
आदम को उसका मालिक बनाता है
मत डरो उस मजहब से
जो एक को महान
और दूसरे को कमतर बताता है
मत डरो ऐसे समाज से
जो धर्म, जाति, लिंग के आधार पर
वरीयता तय करता है
मत डरो ऐसी व्यवस्था से
जहाँ एक शोषक बनकर खून चूसता है
और
दूसरा शोषित बनकर गुलामी करने को
अभिशप्त है
मत डरो उस तानाशाह से
जो छीन लेता तुमसे
तुम्हारी ज़बानें और रीढ़ की हड्डी
सही को सही और
ग़लत को ग़लत कहने की आज़ादी
पर उस औरत से जरूर डरना
जो ईरान में नाचते हुए
अपना हिज़ाब जला रही है
यही औरतें पितृसत्ता के ताबूत में
आखिरी कील ठोंक सकती हैं
ये ख़त्म कर देंगी हर गलत रवायत
ये जिनकी पहचान किसी की माँ, किसी बहन और
किसी की बेटी भर है
अब मुट्ठी में बंद कर लेंगी
तुम्हारी कल की सुबह का सूरज
मेरी मानो इनसे बचकर रहना
ये आगे बढ़ें तो इन्हें रास्ता दे देना
क्योंकि अब इनके रास्ते की
हर रुकावट के फ़ना हो जाने का वक़्त
आ गया है...
©अंजू शर्मा
Anju Sharma