बंधूभाव

बंधूभाव

बंधूभाव

'इन्सान का इन्सान से हो भाईचारा,
यही पैगाम हमारा'
ही त्याची रिंगटोन होती
ट्रेनमधल्या गर्दीमुळे
मी त्याला जवळ जवळ खेटूनच बसलो होतो

फोन त्याच्या आईचा होता
'बेटा जेवलास ना?
निवांतपणे झोपी जा,
सकाळी उतरला की फोन कर
काळजी लागून राहिलीये'

नेमकी हीच भावना नेमक्या याच शब्दात आत्ता काही वेळापूर्वीच माझ्या आईने माझ्याजवळ व्यक्त केली होती,
मी ही आपल्या आईपासून दूर चाललो होतो.

फोनवर त्याच्या आईचा संवाद ऐकून मी भावूक होत होतो
त्या मुलाशी एक अव्यक्त बंधूभाव असल्याची भावना मनात येत होती
अचानक फोन ठेवताना तो म्हणाला,
'अल्ला हाफिज अम्मी'

ऐकून मी जड होऊन गेलो
डोक्यात एक वादळसे उठत होते
बंधूभाव वितळू लागला
भावूकता सुकायला लागली

जेव्हा वादळ शमले,
तेव्हा मी पाहिले की तो एका मुस्लिमामध्ये बदलून गेला होता
फक्त मुस्लीम
आणि मी हिंदूमध्ये बदलून गेलो होतो
फक्त हिंदू.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

'इंसान का इंसान से हो भाईचारा, 
यही संदेश हमारा'
यह उसकी रिंगटोन थी
ट्रेन में भीड़ के कारण 
मैं उससे लगभग सट कर बैठा था

फोन उसकी माँ का था
बेटा खाना खा लिया?
आराम से सो जाना
सुबह उतरते ही फोन करना
चिंता लगी हुई है

ठीक यही बात ठीक इन्हीं शब्दों में 
अभी कुछ देर पहले ही मेरी मां ने मुझे बोली थी
मैं भी अपनी माँ से दूर जा रहा था

फोन पर उसकी माँ की बातचीत सुनकर मैं भावुक हो रहा था
उस लड़के से एक अनकहा भाईचारा महसूस कर रहा था
अचानक फोन रखते हुए उसने बोला
'अल्ला हाफिज़ अम्मी''

सुनकर मैं जड़ हो गया
दिमाग मे एक आंधी सी चलने लगी
भाईचारा पिघलने लगा
भावुकता  सूखने लगी

जब आंधी थमी
तो मैंने देखा कि वह एक मुस्लिम में बदल चुका था
सिर्फ मुस्लिम
और मैं हिन्दू में बदल चुका था
सिर्फ हिन्दू

©मनीष आज़ाद
Manish Azad
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने