सामाजिक-राजकीय आणि सांस्कृतिक चळवळीत निरंतर सक्रीय असलेल्या अमिता शिरीन आपल्या कवितालेखनामधून तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि ऊर्जा देण्याचे कार्य करीत आहेत.
त्या शिक्षीका,लेखक,कवयित्री,सामाजिक कार्यकर्ती अशा वेगवेगळ्या भूमिका मागील वीस वर्षांपासून निभावत आल्या आहेत.
स्त्रीमुक्ती आंदोलनात कारावासही भोगला आहे.सद्या त्या मुक्ती या महिलांच्या प्रश्नांना वाहिलेल्या दैनिकाच्या संपादक आहेत.
आपल्या तिखट आणि टोकदार कवितांसाठी हिंदी साहित्यात अमिता ओळखल्या जातात.
विश्वव्यापी स्त्रीकेंद्रीत दुःखे आणि वेदना या त्यांच्या कवितांचे विषय असतात.आपल्या कवितांमधून समतावादी भूमिका जोरकसपणे मांडण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत.
१.
नृत्य करणार्या स्त्रिया
नृत्य करतायत स्त्रिया
जणू काही नाचते आहे धरती
जणू नाचते आहे अवघे ब्रह्मांड!
पून्हा अचानक नाचायला लागल्यायत स्त्रिया आणखी जोरजोराने....
डोलायला लागले आहेत चंद्र-तारे
विद्रोहात सगळेच्या सगळे...
जणू नृत्य करणे ततकारात
विद्रोहाची अखेरची लय आहे
गती आहे
पाहा तरी
माझ्या नाचण्याने डोलते आहे धरा
ओसंडून फुटू पाहातेय
निर्झरांचे संगीत
माझ्या ओठांमधून...
उठा हुकूमशहांनो!
कोनाडे शोधा
आम्ही एक एक करीत
जाळत चाललो आहोत सगळीच्या सगळी बंधने
त्यासोबतच जळत आहे
तुमची चीड,
तुमचातिरस्कार
अजूनही खूप काही
उठा बापांनो,
हसा,नाचा माझ्यासोबत
विश्वास ठेवा
फुलासारखे हलके होऊन जाल तुम्हीही.
भूतकाळाचे सारे ओझे उतरवून
ते आगीच्या स्वाधीन करा माझ्यासोबत!
बायकांचे नृत्य या काळातली
सर्वात सुंदर गोष्ट आहे!
पाहा तरी या नृत्यांगणांना
डोळे भरभरून
तिरस्काररूपी तुमचे अस्तित्व
वितळून जाईल
सर्वच्यासर्व
संस्कृती वळण घेण्यासाठी अधीर झालीये
दोन पावलं चालू तरी लागा...
२.
माय
माय ओ माय
मला सांग की कुठे गेलीये तुझी ती
कुदळ
ज्याने सपाट केली होती तू
त्याकाळची खडकाळ जमीन
आणि पेरले होतेस धान्याचे
पहिले बी
माये!
आठव आपल्या त्या शक्तीला
जेव्हा पुढे सरकवले होतेस तू
इतिहासाच्या त्या जड चाकाला!
आज का झालीयस तू इतकी असहाय?
माये!
तू तर पृथ्वी आहेस
जवळ जवळ
साठ लाख वर्षांचे वय तुझे.
तरीही बाब तुला रागावतात
निव्वळ यासाठी की
डाळीत मीठ कमी होते,
आणि भाकर जरा जाड होती म्हणून
म्हणजे तितकी पातळ नव्हती
कागदाइतकी.
एकदा तू
आपल्या मैत्रिणी सोबत गप्पा मारत होतीस जीव उलगडून
माये!
बाबाला ही गोष्ट तीळभरही सहन होत नाही
तू जगू पाहातेस भरभरून
तुला भडक रंगच आवडतात
आणि तिखट चवदेखील
माये!
मी तुला खळखळून हसताना पाहू इच्छिते
की एकदा तू बोल
आपल्या मूळ आवाजात
एक वेळेस खरोखरीच व्हावा
तुझा जीव गोड गोड
माये!
एकदा गुपचूप पाहिले होते मी
जेव्हा बाबाने प्रेमाने
धरला होता तुझा हात
धरती वितळायला लागली होती
तेव्हा
जणू खवळले होते समुद्र सगळे
जणू निर्झरांची गती वाढली होती अचानक
डोलायला लागली होती सृष्टी अवघी
फुटायला लागले होते हिरवे कोंब जिकडे तिकडे
परंतू
माये!
खूप राग आला होता मला
त्यादिवशी
जेव्हा बाबाने
हिसकावली होती तुझी कुदळ
जी घेऊन तू डोलत असायचीस
वनावनातून
खोदत राहायचीस मूळा सूरण
आणखी न जाणो कुठली कुठली कंदमुळे
ज्यामुळे जिवंत राहू शकेल संतती
खायला घालायचीस तू बाबाला सुद्धा
जेव्हा परतायचा तो रिकाम्या हाताने
शिकारीहून
त्याच कुदळीने करायचीस तू शिकारदेखील
आणि त्या जखमी सशाचे पिलू
ज्याला पाळले होतेस तू बाळाप्रमाणे
त्याच कुदळीने तू उकरलेस शेत
आणि पेरले होते बीज
माये!
बोलावून घेतले होतेस तू
बाबाला
आपल्या मुक्कामी माघारी
जे भटकत होते अजूनही
जंगलात क्रूर
शिकारीच्या शोधार्थ.
माये!
त्यावेळेस
तू इतिहासाचे चक्र
आपल्या कुदळीने पुढे ढकलले होतेस
माये!
तूच करू शकत होतीस हे सर्व
कारण तू धरती होतीस
सर्वांना सांभाळून आपल्या काळजात
आणि एक दिवस
बाबाने पुढे सरसावून हिसकावली ती कुदळ तुझ्या हातामधून
हे ओळखून की हीच आहे तुझी शक्ती
करून टाकले बंद तुला त्या कोठडीत
जी तुझी कधी नाही झाली
आणि करायला लागले
जुलूम जबरदस्ती
ज्यामुळे जन्माला घालावास तू
एखादा वारस
आणि ठरवू लागले मिठाचे प्रमाण
डाळीत आणि तुझ्या स्वतःच्या आयुष्यातदेखील
माये!
संताप येतो मला तुझ्यावरसुद्धा
की का स्विकारलास तू पराभव
की का नाही बनवू शकलीस तू बाबाला खराखुरा सभ्य
क्रूरच आहे बाबा अद्यापही
माये!
विश्वास ठेव माझ्यावर
बाबा मला चांगले वाटत नाहीत
जेव्हा ते तुला रागावतात
माये!
मला रडायला येते तेव्हा
बाबा तुला झिडकारतात
मला रडायला येतेय
माये!
मला खूप रडायला येते!
खरोखरीच रडायला येते!!
माये!
चल आपण मिळून
आपल्या त्या कुदळीला
हिसकावून आणू
आणि इतिहासाचे चाक
पुन्हा एकदा पालटून टाकू...!!!
३.
चिमणीसारखे भुर्र उडून जावे
म्हणतेय मी
मग आठवतात तिच्या उडण्यातल्या अडचणी
मोकळे आकाश नाही देत कुठलीही सवलत..
दुरून बसल्या बसल्या नाही करता येत घुसमटीचा अंदाज
चिमणीच्या आतली घुसमट अशी किती असेल?
इवलीशी!
पण तिला तर
ओलांडायचे आहे सारे आकाश...
अवघे आकाश असते
चिमणीच्या काळजाची घुसमट
इतके सूक्ष्म अनुभवण्यासाठी
चिमणी व्हावे लागेल...
भुर्र उडणे इतके सोपे नाही...
४.
एक काळी कविता
मी काळी आहे
मी खूप काळी आहे
आणि मी सुंदर आहे
खूप सुंदर
फार पूर्वी
जेव्हा कट्टरतावाद्यांनी
हिरावून फेकून दिले होते
मला माझ्या आईच्या ओटीतून
जहाजाचे ओझे हलके करण्यासाठी
तेव्हापासून शोधत आहे मी
समुद्राच्या अफाट खोलीत
आयुष्याचे पवित्र मोती
आई
तुझ्यावर झालेल्या प्रत्येक बलात्काराला झेलले आहे मी माझ्यावर
तुझ्या गर्भातील समुद्रात
जोरजोराने
बुडण्यासाठी उतरू लागायची मी
गुलामांच्या त्या जहाजाप्रमाणे
ज्यात भरून घेऊन गेले होते ते
माझ्या वडिलांना विकण्यासाठी
इतिहासाच्या सागराच्या तळाशी
मला मिळाले आहे अवशेष
त्याच जहाजाचे
त्या अवशेषातून मी शोधून काढल्या आहेत बेड्या
ज्या पडल्या होत्या त्यांच्या पायामध्ये
आई मला वितळवायच्या आहेत
या बेड्या
एक एक करून सार्या
आई
मला आपला काळा रंग आणखी तापवायचा आहे
इतका चमकदार करायचा आहे की
बदलून जातील काळ्या रंगाचे अर्थ
माझी काळी चेतना म्हणतेय
माझा काळा रंग फक्त रंग नाहीये
ही मानवतेच्या वृद्धींगत होण्याची
सुंदर गाथा आहे
विखरून गेले होते बियांप्रमाणे
आमचे काळे पूर्वज सगळे
आफ्रिकेपासून आशिया आॅस्ट्रेलिया अमेरिका आणि इथे तिथे
माझ्या काळ्या आईने
धारण केले होते अवघ्या मानवतेला
आपल्या गर्भात
तेव्हा माझी आई गुलाम नव्हती
काळा रंग सुद्धा नव्हता कुणाच्या अधीन
त्याच काळ्या आईच्या गर्भातून जन्माला आलेय मी
काळी आहे खूप काळी
आणि खूप सुंदर
मला करायचेय या जगाला
स्वतःइतकेच सुंदर
स्वतःपेक्षाही आणखी अधिक सुंदर
आणखी काळे,आणि सुंदर..
५.
अॅना करोनिना सिनेमा पाहिल्यानंतर
नाही अॅना,
त्या रेल्वेरूळांच्या दिशेने
अजिबात जाऊ नकोस
मान्य आहे घुसमट प्रचंड आहे
पण रेल्वेरूळावरून नाही जात
तुझा रस्ता
ज्याप्रमाणे जीवापाड
केलेस तू प्रेम
त्या काळातदेखील
नाहीये शक्य तसे करणे
त्या उंचीपर्यंत
आणि इतके नितांत प्रेम
असूच शकत नाही
आणि या कुरूप काळात
सर्वात कठीण आहे प्रेम करणे
तू करू शकलीस याप्रमाणे प्रेम
कारण तू राजकन्या होतीस
करावे लागले नाहीत तुला कष्ट
स्टेपीच्या मैदानांमध्ये
किंवा धूर ओकणार्या स्वयंपाकघरांमध्ये
कारण फारच अवघड आहे
थकल्या भागल्या तनामनाने
प्रेम करणे
अवश्य तुझे मन थकून गेले होते
आपल्या शेवटच्या पोर पर्यंत
धाडशी होती तू याप्रमाणे
तरीही का गेलीस तू त्या रेल्वेरूळांकडे
अॅना, हा रस्ता तुझा असू शकत नाही
हा रस्ता कुठल्याही अशा व्यक्तीचा असू शकत नाही ज्याला ठाऊक आहे की या कुरूप जगात
प्रेम करणे शक्यच नाही
अॅना चल, या जगाला
सुंदर बनविण्याची मोहीम सुरू करू
ज्यामुळे रेल्वेरूळांवर
होऊ शकणार नाही कुणाची हत्या...
अॅना संकल्प कर की
कुठल्याही युगामध्ये
करणार नाहीस आत्महत्या
परिणामी येणार्या पिढ्या तुला
मरण्यासाठी नव्हे
जगण्यासाठी आठवणीत ठेवू शकतील
अॅना तुझे मरणे
आम्हांला व्याकुळ करत
असते गं क्षणोक्षणी.
--------------------
मूळ हिंदी कविता
अमिता शिरीन
१.
रक्स करती हैं औरतें
जैसे कि धरती नाचती है
जैसे नाचता है ब्रह्मांड सारा!
फिर सहसा नाचने लगती हैं औरतें
और भी ज़ोर से....
झूमने लगते है चांद सितारे
प्रतिरोध में सारे के सारे..
के रक्स करना तत्कार में
प्रतिरोध की अंतिम लय है/गति है...
देखो तो
मेरे नाचने से झूम उट्ठी है धरा
मचल के फूटने लगा है
झरनों का संगीत
मेरे लबों से..
उठो तानाशाहों
कोने तलाशो
हम एक-एक करके
जला रहे हैं बंदिशें सारी की सारी
साथ ही जल रही है
तुम्हारी कुढ़न, नफ़रत और भी बहुत कुछ
उट्ठो पिताओं
हंसो, नाचो मेरे साथ-साथ
यक़ीन मानो
फूल से हल्के हो जाओगे तुम भी.
अतीत का सारा बोझ उतार कर
आग के हवाले कर दो मेरे साथ!
औरतों का रक्स इस वक्त की
सबसे खूबसूरत शै है!
देखो तो इन रक्कासाओं को
नज़र भर भर कर.
नफ़रत का तुम्हारा वजूद पिघल जायेगा
सारा का सारा..
सभ्यता करवट लेने को बेताब है
दो कदम चलो तो सही..…..
२.
अम्मा!
ओ अम्मा!
मुझे बताओ कि कहां गई तुम्हारी वह गैंती
जिससे कोड़ी थी तुमने
उस वक्त की पथरीली ज़मीन
और बोया था अन्न का पहला बीज.
अम्मा!
याद करो अपनी उस ताक़त को
जब आगे बढ़ा दिया था तुमने
इतिहास के उस भारी पहिए को.
आज क्यों हो गई हो तुम इतनी निरीह?
अम्मा!
तुम तो पृथ्वी हो
तकरीबन
60 लाख बरस की उमर तुम्हारी.
फिर भी पापा तुम्हें डांटते हैं
केवल इसलिए कि
दाल में नमक कम था,
के रोटी थोड़ी मोटी थी
मतलब उतनी पतली नहीं थी
कागज़ जितनी.
के एक बार तुम
अपनी सहेली से बतिया रही थी जी खोल के.
अम्मा!
पापा को यह बात रत्ती भर नहीं सुहाती
के जीना चाहती हो तुम भरपूर.
के तुम्हें चटक रंग ही भाते हैं.
और चटक स्वाद भी.
अम्मा!
मैं तुम्हें खिलखिला कर हंसते देखना चाहती हूं
के एक बार तुम बोलो
अपनी स्वाभाविक आवाज़ में.
के एक बार सचमुच हो
तुम्हारा जी मीठा मीठा.
अम्मा!
एक बार चुपके से देखा था मैंने
जब पापा ने प्यार से
गहा था तुम्हारा हाथ
धरती पिघलने लगी थी तब
के मचल उट्ठे थे दरिया सारे
के झरनों का वेग बढ़ गया था सहसा
झूमने लगी थी कायनात सारी
अंखुआ गए थे हरे कोंपल यहां वहां.
लेकिन
अम्मा!
बहुत गुस्सा आया था मुझे
उस रोज़
जब पापा ने
छीन ली थी तुम्हारी गैंती, जिसे
लिए-लिए तुम डोला करती थी
वन - वन.
खोदा करती थी ओल /सूरन
और ना जाने कौन - कौन से कंदमूल.
जिससे ज़िन्दा रह सकें संततियां.
देती थी खाना तुम पापा को भी
जब लौटते थे वह खाली हाथ
शिकार से.
उसी गैंती से करती थी तुम शिकार भी.
और
वह घायल खरगोश का छौना
जिसे पाला था तुमने शिशुवत.
उसी गैंती से तुमने कोड़े थे खेत
और बोए थे बीज.
अम्मा!
बुला लिया था तुमने पापा को
अपने डेरे में वापस
जो भटक रहे थे अभी भी
जंगल में बर्बर
शिकार की तलाश में.
अम्मा!
उस समय
तुमने इतिहास का
चक्र अपनी गैंती से आगे घुमा दिया था.
अम्मा!
तुम ही कर सकती थी यह सब
क्योंकि तुम धरती थी
सबको समेटे अपने कलेजे में.
और एक रोज़
पापा ने आगे बढ़ कर छीन ली वह गैंती
तुम्हारे हाथ से
यह पहचान कर के यही है तुम्हारी ताक़त.
कर लिया क़ैद उस कोठरी में
जो तुम्हारी कभी नहीं हुई.
और करने लगे
ज़ोर ज़बरदस्ती
ताकि जन सको तुम
एक अदद वारिस,
और तय करने लगे नमक की मात्रा
दाल में और तुम्हारी अपनी ज़िन्दगी में भी.
अम्मा!
गुस्सा आता है मुझे तुम्हारे ऊपर भी
कि क्यों मान ली तुमने हार,
कि क्यों नहीं बना पाई तुम पापा को
सचमुच का सभ्य.
के बर्बर ही बने हुए हैं पापा अभी तक.
अम्मा!
यकीन करो मेरा
पापा मुझे अच्छे नहीं लगते
जब वह तुम्हें डांटते हैं.
अम्मा!
मुझे रोना आता है जब
पापा तुम्हें दुत्कारते हैं.
मुझे रोना आता है..!
अम्मा!
मुझे बहुत रोना आता है!
सचमुच का रोना आता है!!
अम्मा!
चलो हम मिल कर
अपनी उस गैंती को
छीन लाएं
और इतिहास का पहिया
एक बार फिर उलट दें.....!!!
३.
चिड़िया की तरह फुर्र हो जाना
चाहती हूं मैं.
फिर याद आती है उसके उड़ने की तकलीफ़ें.
खुला आसमान नहीं करता कोई रियायत..
दूर से बैठे-बैठे नहीं महसूस कर सकते
घुटन.
चिड़िया के भीतर की घुटन कितनी सी होगी?
इत्तू सी!
पर उसे तो
पार पाना है समूचा आकाश...
समूचा आकाश होता है
चिड़िया के कलेजे की घुटन.
इतना बारीक महसूसने के
लिए चिड़िया होना पड़ेगा...
फुर्र होना इतना आसान नहीं....
४.
एक काली कविता
मैं काली हूं
मैं बहुत काली हूं
और मैं सुन्दर हूं.
बहुत सुंदर.
बहुत पहले
जब आतताइयों ने
छीन के फेंक दिया था
मुझे मेरी मां की गोद से
जहाज का बोझ हल्का करने के लिए.
तभी से खोज रही हूं मैं
समुन्दर की अतल गहराइयों में
जीवन का सुच्चा मोती.
मां
तुम्हारे ऊपर हुए हर बलात्कार को
झेला है मैंने अपने ऊपर
तुम्हारी कोख के समन्दर में
ज़ोर ज़ोर से
डूबने उतराने लगती थी मैं.
गुलामों के उस जहाज की तरह
जिसमें भर कर ले गए थे वे
मेरे पिता को बेचने के लिए.
इतिहास के सागर की
तली में
मुझे मिला है मलबा उसी जहाज का
उस मलबे से मैंने खोज निकाली हैं
बेड़ियां
जो पड़ी थी उनके पांवों में.
मां मुझे पिघलानी हैं
ये बेड़ियां
एक एक करके सारी
मां
मुझे अपना काला रंग और तपाना है
इतना चमकदार करना है कि
बदल जाए काले रंग के मायने.
मेरी काली चेतना कहती है
मेरा काला रंग
सिर्फ़ रंग नहीं
ये इंसानियत के बढ़ते जाने की
शानदार दास्तान है.
बिखर गए थे बीज की तरह
हमारे काले पुरखे सारे.
अफ्रीका से एशिया ऑस्ट्रेलिया अमेरिका
और यहां वहां.
मेरी काली मां ने
धारण किया था समूची मानवता को
अपनी कोख में
तब मेरी मां गुलाम नहीं थी
काला रंग भी नहीं था किसी के वश में.
उसी काली मां की कोख से पैदा हुई मैं
काली हूं बहुत काली
और बहुत सुंदर.
मुझे बनाना है इस दुनिया को
अपने जितना ही सुंदर
अपने से कहीं ज़्यादा सुंदर
और काला, और सुंदर...
५.
अन्ना करेनिना फिल्म देखने के बाद...
नहीं अन्ना उन पटरियों की ओर
कतई मत जाना.
( यह पंक्ति Alok Shrivastav से साभार)
माना के घुटन है बड़ी भारी,
पर पटरियों से होकर नहीं जाता तुम्हारा रास्ता.
जिस तरह टूट कर
किया तुमने प्यार,
उस दौर में भी.
नहीं सम्भव है करना
उस ऊंचाई तक
और इतना गहरा प्यार.
हो ही नहीं सकता.
और इस कुरूप समय में,
सबसे कठिन है प्यार करना.
तुम कर सकी इस क़दर प्यार
क्योंकि तुम राजकुमारी थी
नहीं करनी थी तुम्हें मशक्कत
स्टेपी के मैदानों में
या कि धुआं उगलती रसोईघरों में.
क्योंकि बहुत मुश्किल है
थके हुए तन मन से
प्यार करना.
बेशक तुम्हारा मन थक चुका था
अपने अंतिम पोर तक.
साहसी थी तुम इस क़दर
फिर क्यों गई तुम उन पटरियों की ओर.
अन्ना ये रास्ता तुम्हारा नहीं हो सकता
ये रास्ता किसी भी उस व्यक्ति का
नहीं हो सकता जिसे पता हो कि
इस बदसूरत दुनिया में
प्यार करना संभव ही नहीं.
अन्ना चलो इस दुनिया को
सुंदर बनाने की मुहिम में लग जाएं
ताकि पटरियों पर
ना हो सके किसी की हत्या...
अन्ना करो वादा के
किसी भी युग में
नहीं करोगी आत्महत्या.
ताकि आने वाली नस्लें तुम्हें
मरने के लिए नहीं
जीने के लिए याद रखें.
अन्ना तुम्हारा मरना
हमें बेकल करता है
हरदम!