युवा कवयित्री ज्योती रीता यांनी
झारखंडमधील विनोबा भावे विद्यापीठ, हजारीबाग येथून हिंदी साहित्यातून एम.ए. एम.एड. केले आहे.हिंदीतील विविध नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत.आजवर पाच संकलीत कवितासंग्रहांमधून त्यांच्या कविता वाचकांपुढे आल्या आहेत.
सद्या बिहार राज्यात सरकारी अध्यापनक्षेत्रात
कार्यरत आहेत.
'मैं थिगली में लिपटी थेर हूॅं।' या शीर्षकाचा त्यांचा काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होत आहे.
ज्योती रीता आपल्या कवितांमधून भारतीय संविधानातील
श्रेष्ठ मानवी मूल्यांची पेरणी करीत आल्या आहेत.समतावादी समाजरचनेची आस लागलेली त्यांच्यातली एक कवयित्री नेहमीच अस्वस्थपणाचा प्रत्यय आपल्या कवितांमधून देत आली आहे.उपेक्षित वर्गाविषयीची आत्यंतिक तळमळ त्यांच्या कवितांमधून सातत्याने अधोरेखीत झाली आहे.वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारी नवी पिढी घडविण्याचा संकल्प एक शिक्षिका या नात्याने पार पाडत असताना काव्यलेखनामधूनही समाजप्रबोधनाचा वारसा पुढे नेण्याचा
त्यांचा दृढनिश्चयच दिसून येतो.स्त्रीजाणीवांना सशक्तपणे शब्दरूप देताना श्लील-अश्लिलतेच्या कृत्रीम भिंतींना
ज्योती रीता यांची कविता जुमानत नाही.
१.
बाॅम्बभोवती गुंडाळलेली
मुलायम रिबीन
स्त्रीच्या इच्छा
प्रेतावरती घोंगावणार्या
माशांसारख्या असतात
ज्यांना पुनःपून्हा
एखाद्या फाटक्या जुन्या शेल्याप्रमाणे
उडवून लावले जात असते
त्या पुनःपून्हा बसण्याचा प्रयत्न करतात
वारंवार स्त्री त्यांना उडवून
लावण्याचा यत्न करते
या प्रयत्नांमध्ये
गहिरे मौन असते
अंतर्मनातल्या वादळाचा पत्ता
तेव्हा लागतो जेव्हा अर्ध्या रात्री स्त्री जागत असते
त्याचवेळी स्त्री जगत असते
आपली आतली आग
गूढ भ्रामक राहिला तो रस्ता
ज्यावर चालून मूक राहिली स्त्री
कानांनी ऐकूनदेखील ती बहिरी होती
तिचे बोलणे चिमणीच्या ची.. इतके होते
कण्हेरीच्या बागांमध्ये
मनाचा कोपरा गोंजारत
खोचून यायची तिथे
मनात
उभे राहिलेले तंतू
कुमार्गी होण्यापेक्षा सोपे होते
गुपचूपपणे सहन करीत जाणे
श्वासाला रोखण्याइतके बेढब होते
अनैच्छिक नात्याला दोन तंगड्यांच्यामध्ये जागा देणे
जलकुंभासारख्या देहाला
कोमेजत राहिली
घास बनत राहिला देह
आपल्याच देहाचा
गाठी आणखी घट्ट झाल्या
बाॅम्ब-बारूदाच्या मधून मधून
self-portrait चितारत राहिली
बुडावर आणि मांड्यांवर
निळ्या खूणा असतानादेखील
उमलवीत राहिली चंद्रावरती
शेवरीची फुलं
स्त्री म्हणजे अपार सौंदर्याचे एक धडधडते जिवंत प्रतिक होय
आंद्रे ब्रेंतों याने उगाचच
फिदा काइलो म्हणजे स्त्रीला
बाॅम्बभोवती गुंडाळलेली
मुलायम रिबीन असे म्हटले नव्हते!
-----
२.
माझ्या मुला!
फक्त इतकाच भरवसा दे.
माझ्या मुला!
जेव्हा तू जगाच्या शाळेत जाशील
तू आपल्या नजरांवर नजर ठेव बरं!
कधी वाट चुकलेल्या गर्दीचा
भाग बनू नकोस
सगळ्या धार्मिक झेंड्यांना नदीत फेकून दे.
भाळावर मातीचा गंध लावावास
झाडा-झुडूपांकडून प्रेम शिकावे
चिमण्यांकडून चिवचिवणे आणि
खारीकडून चपळता शिकावी
प्रेयसीच्या हातावर हात ठेवून
तिच्या माथ्याचे चुंबन घ्यावेस
प्रेमाला मौनाच्या भाषेने साधावे
माझ्या मुला!
जेव्हा देशाचा विषय येईल,तेव्हा
कुठल्याही रंगाच्या झेंड्याला
हाती घेण्याआधी
भगतसिंग आणि राजगुरू
यांचे स्मरण असावे
कबीर आणि रहीम
आठवावेत
देश आणि देशातले
अब्जावधी लोक
स्मरावेत
गंगा-जमुनी संस्कृती
आठवावी
माझ्या मुला!
जेव्हा
मर्यादेचा विषय येईल,तेव्हा
तिथे मौन धारण करू नकोस
अग्रणी होऊन म्हणावेस तू
'आम्ही कुठल्याही जात-धर्म-संप्रदायाआधी
माणूस आहोत.'
--------
३.
आम्ही चिखलातले कवी होतो
आम्ही राजधानीत बसून लिहिणारे लोक नव्हतो
आम्ही गुडघ्यापर्यंत चिखलात रूतलेले लोक होतो
आम्ही धानपेरणी करता करता लिहित होतो कविता
गव्हाच्या भुर्या लोंब्या पाहून
थरथरून जात असू
त्याचक्षणी डोळ्यांच्या कडांमधून टपकत असायची कविता
मोहरीची पिवळी फुलं बघून आम्ही पहिल्यांदा प्रेमकवितेची चव चाखली
रानफुलांनी कवितांना सुगंधीत केलं
काट्यांमध्ये सावधपणे त्यांना स्थापित होणंं शिकवलं
आम्ही लाकडाच्या चूलीवर
शिजणारा भात होतो
आम्ही भगोण्यात शिजणारी
डाळ होतो
आम्ही विस्तवावर शिजवलेले बटाटे,मिरची आणि एक
चिमुटभर मीठ होतो
आम्ही सावकारानं हासडलेली
शिवी होतो
आमच्यासाठी कुठला मंच नव्हता
मंचाच्याखाली आमच्यासाठी कुठली खुर्ची टाकलेली नव्हती
आम्ही रांगेच्या शेवटी उभे राहून सभ्य,शालीन,पारंगत कवींकडून मजूर,दलित,शोषितांवर कविता ऐकत होतो
आम्ही ज्येष्ठाच्या भर दुपारी तापणारे
लोक होतो
आम्ही आषाढातील पावसात भिजणारे लोक होतो
आम्ही दान-भीकेत आलेले
लोक होतो
आमच्या वाट्याचे सुख शोषून
घेण्यात आले होते
आम्ही दुःखाच्या मागे पळणारे
धावक होतो
आमच्या नशिबी पहिली रांग
उपलब्ध नव्हती
आम्ही रांगेत शेवटी उभे राहाणारे लोक होतो
आम्ही असभ्य आणि
अशिष्ट लोक होतो
आम्हांला अंगभर कापड,
पोटभर जेवण कधी नाही मिळाले
मिळालेल्या चिटोर्यांवर आम्ही रोज कविता लिहित होतो
आम्ही दोनजणांची भाकरी कमावत कमावत कविता लिहित होतो
एक बैल मारला गेला तर त्याच्याऐवजी शेत नांगरणारे आम्ही
लोक होतो
आम्ही सतत शेता-रानात उभे
राहून राहून कविता लिहित होतो
आता कविता पक्व झाल्यात,
त्या संसदेत पोहोचण्यासाठी सज्ज आहेत.
-------
४.
प्रतिक्षा
आपल्यातली भाषा मौन आहे
मौन जीभ आहे
बंद डोळ्यांनी ऐकते आहे
तू म्हणतोस काही शब्द / जे प्रेमात आकंठ बुडालेत
वेळ शोधत राहिलो आम्ही
ज्यामुळे संवाद घडू शकेल
अधूरेपणाला केले जाऊ शकावे पूर्ण
बोलणे सोपे होते/ गप्प राहाणे जास्त सोपे
तसबिरीच्या एकांतात आम्ही करीत राहिलो संवाद
गुडूप अंधार असेल तर
दिसतो तुझा हात
दूरवर वाजतो आहे कुठलासा राग
कुणीतरी नावाने हाका मारतोय
ही प्रेमगीत गुणगुणण्याची वेळ आहे
तू झोडीत राहा समाज सुधारणेच्या
गप्पा
रात्री बेरात्रीपर्यंत जागत राहिलास
वाचत राहिलास 'फुको'चे तत्वज्ञान
जर परवानगी असेल तर
तुझ्या उरातल्या रेताड जमिनीवर
प्रीतीचे बीज पेरावे म्हणते
आपण बर्याच दिवसांपासून
सकाळ होण्याची प्रतिक्षा केली आहे.
-----
५.
वडिलांचे बालपण
वडिलांना नीटसे आठवत नाही
त्यांच्या वडिलांचा चेहरा कसा होता ते
वडिलांच्या आईची बांगडी बालपणीच फोडण्यात आली होती
ती आजीवन घरात वृद्धत्वाप्रमाणे
झुलत राहिली
बहिणींचा चेहरा उदास होता
वडिलांनी त्यांना वडिलांची सावली दिली
वडिल जेव्हा वडिल बनले
तोवर त्यांच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाचे ओझे होते
वडिलांचा खांदा नेहमी जरासा झुकलेला राहिला
वडिलांना स्मरत नाही
त्यांनी कधी हट्ट धरला होता
नविन कपडे कधी शिवले होते
कधी गरम गरम जेवले होते
खरेतर धान्याचे पोते नेहमी तेच आणीत असत,मात्र
घास सगळ्यात शेवटी घ्यायचे
वडिलांचे केस अर्धे काळे होते
पण वडिल वय होण्यापूर्वीच
वयस्कर झाले
वडिलांना बालपणीची कुठली गोष्ट
आठवत नाही
वडिलांच्या प्रत्येक गोष्टीत भाकर आणि भात आहे
वडिलांनी मित्रांसमवेत कधी
उनाडकी नाही केली
पहिले प्रेम त्यांनी पत्नीवरच केले
तरीही वडिल कधी उदास नाही दिसले
वडिलांच्या भाळावर आकांक्षेची रेषा
नेहमी खोल होती
वडिलांपाशी कुठली पदवी नव्हती
वडिलांनी जबाबदार्या सांभाळताना
कितीतरी पदव्या मिळविल्या
वडिल आजीवन कष्ट करीत राहिले
वडिलांनी दिलेल्या शिकवणुकीमुळे
आम्ही कष्टाळू बनलो
वडिलांची पिशवी अधिकउणे आता आमच्या हातात आहे
वडिलांच्या तासलेल्या खांद्यावर आता आम्ही हात ठेवत असतो
आता वडिल बालपणात
परतत आहेत
कपडे आणि बूटाची फर्माइश
करीत असतात
जेवणात मीठ कमी किंवा जास्त
झाल्याचे सांगतात
कैक गंभीर गोष्टींना हसून टाळत
असतात
ही वडिलांच्या बालपणाची
प्राथमिक अवस्था आहे.
-------
मूळ हिंदी कविता
१.
बम के गिर्द लिपटा मुलायम रिबन
स्त्री की चाहनाएं
मृत देह पर भिनभिनाती मक्खियों सी थी
जिन्हें बार-बार
किसी फटे पुराने गमछे से उड़ा दिया जाता
वे बार-बार बैठने की कोशिश करतीं
बार-बार स्त्री उन्हें उड़ाने की कोशिश करती
इस कोशिशों में गहन चुप्पी थी
अंतस की आंधी का पता तब चला जब आधी रात स्त्री जागती
उसी वक़्त स्त्री जीती थी अपने अंदर की आग
गहन भ्रामक रहा वह रास्ता
जिस पर चलकर मूक बनी स्त्री
कानों से सुनते हुए भी वह बधिर थी
उसका बोलना गौरैया के ची जितना था
कनेर के बागों में मन का कोना सहलाती
खोंस आती वहां मन के उभरे तंतु
कुमार्गी होने से सहज था
चुपचाप सह जाना
श्वास के रोकने जितना बेढ़ब था
अनचाहे रिश्ते को दो टांगों के बीच ज़गह देना
जलकुंभी सा देह को कुंभलाती रही
ग्रास बनती रही देह अपनी ही देह की
गाँठें और गहरी हुईं
बम बारूद के बीच बीच self-portrait बनाती रहीं
कूल्हे और जांघों पर नीले निशान के बावजूद उगाती रहीं चांद पर सेमल के फूल
स्त्री अपार सौंदर्य का एक धड़कता हुआ जिंदा प्रतीक है
आंदरे ब्रेतों ने यूं ही फ़ीदा काहलो(स्त्री) को बम के गिर्द लिपटा मुलायम रिबन नहीं कहा था।।
२.
मेरे बच्चे! बस इतना ही विश्वास दिलाना
मेरे बच्चे!
जब तुम दुनिया की पाठशाला में जाना
तुम अपनी नज़रों पर नज़र रखना
कभी गुमराह भीड़ का हिस्सा मत बनना
सारे धार्मिक झंडों को कोसी में बहा देना
ललाट पर माटी से तिलक करना
पेड़-पौधे से प्रेम सीखना
चिड़ियों से चहचहाना
गिलहरी से चपलता सीखना
प्रेमिका की हथेली हाथ में रखकर उसके माथे को चूमना
प्रेम को मौन की भाषा से साधना
मेरे बच्चे!
जब देश की बात आए
किसी भी रंग के झंडे को थामने से पहले
भगत सिंह और राजगुरु याद रहे
कबीर और रहीम याद रहे
देश और वहाँ के अरबों लोग याद रहे
गंगा-जमुनी तहजीब याद रहे
मेरे बच्चे!
जब आन पर बात आए
वहां चुप्पी मत साधना
मुखर होकर कहना
हम किसी जाति/धर्म/ संप्रदाय से पहले मनुष्य हैं।।
३.
हम कीचड़ के कवि थे
हम राजधानी में बैठकर लिखने वाले लोग नहीं थे
हम घुटनों तक कीचड़ में धँसे लोग थे
हम धनरोपनी करते हुए लिख रहे थे कविता
गेहूं की भूरी बालियों को देख सिहर उठते थे
उसी वक्त आँखों के कोर से ढुलक आती थी कविता
सरसों के पीले फूल देखकर हमने पहली प्रेम कविता का स्वाद जाना
जंगली फूलों ने कविताओं को सुगंधित किया
कांटों में सावधानी से उन्हें स्थापित होना सिखाया
हम लकड़ी के चूल्हे पर पकने वाले भात थे
हम डेगची में सीझने वाले दाल थे
हम आग पर पकाए गए आलू, मिर्च और एक चुटकी नमक थे
हम महाजन के दिए गाली थे
हमारे लिए कोई मंच नहीं था
मंच के नीचे हमारे लिए कभी कोई कुर्सी नहीं लगाई गई थी
हम पंक्ति के आख़िर में खड़े होकर सभ्य,शालीन, सलीकेदार कवियों से मजदूरों, दलितों, शोषितों पर कविताएँ सुन रहे थे
हम जेठ की दुपहरी में तपने वाले लोग थे
हम आषाढ़ के बारिश में भीगने वाले लोग थे
हम दान-खैरात में आए लोग थे
हमारे हिस्से का सुख सोख लिया गया था
हम दुखों के पीछे भागते धावक थे
हमारे माथे पर पहली पंक्ति मयस्सर नहीं थी
हम पंक्तियों के आख़िर में खड़े होने वाले लोग थे
हम असभ्य और अशिष्ट लोग थे
हमें तन भर कपड़ा जी भर खाना कभी नहीं मिला
मिले चीथड़ों पर हम रोज़ कविताएँ लिख रहे थे
हम दो जून की रोटी मुहैया करते-करते कविताएँ लिख रहे थे
एक बैल के मारे जाने पर उनकी जगह खेत जोतने वाले लोग थे
हम लगातार खेतों में खड़े हो-होकर कविताऍं लिख रहे थे
अब कविताएँ पक चुकी हैं
वह संसद पहुंचने के लिए तैयार है।
४.
प्रतिक्षा
हमारे बीच की भाषा मौन है
चुप्पी जुबान है
बंद आंखों से सुनती हूँ
तुम कहते हो कुछ शब्द /जो प्रेम में आकंठ हैं
वक्त ढूंढते रहे हम ताकि हो सके संवाद
अधूरेपन को किया जा सके पूरा
कहना आसान था /चुप रहना ज्यादा सहज
तस्वीर के एकांत में हम करते रहे बातें
धुप्प अंधेरा हो तो दिखता है तुम्हारा हाथ
दूर बजता है कोई राग
पुकारता है कोई नाम
यह प्रेम गीत गाने का समय है
तुम करते रहे समाज सुधार की बातें
आधी आधी रात तक जागते रहे
पढ़ते रहे फ़ूको का दर्शन
गर इजाज़त हो
तुम्हारे सीने की ऊसर ज़मीन पर प्रेम बीज बोना चाहती हूँ
हमने बहुत दिनों तक सुबह होने का इंतजार किया है।।
५.
पिता का बचपन
पिता को ठीक-ठीक याद नहीं
उनके पिता का चेहरा कैसा था
पिता के मां की चूड़ी बचपन में ही तोड़ दी गई थी
वह आजीवन घर में सफ़ेदी की तरह झूलती रही
बहनों का चेहरा उदास था
पिता ने उन्हें पिता का साया दिया
पिता जब पिता बने
तब तक उनके कंधों पर संपूर्ण परिवार का बोझ था
पिता का कंधा हमेशा थोड़ा झुका रहा
पिता को याद नहीं
उन्होंने कब ज़िद की थी
नए कपड़े कब सिलवाए थे
कब गरम-गरम खाना खाया था
हालांकि अनाज का झोला हमेशा वही लाते
निवाला अंत में उठाते
पिता के बाल आधे काले थे
परंतु पिता उम्र से पहले उम्र दराज़ हुए
पिता को बचपन की कोई कहानी याद नहीं
पिता की हर एक कहानी में रोटी और चावल है
पिता ने दोस्तों के साथ आवारगी कभी नहीं की
प्रथम प्रेम उन्होंने पत्नी से ही किया
इतने पर भी पिता कभी उदास नहीं दिखे
पिता के ललाट पर उम्मीद की रेखा हमेशा गहरी थी
पिता के पास कोई डिग्री नहीं थी
पिता जिम्मेदारियों को निभाते हुए कई डिग्रियां हासिल की
पिता आजीवन मेहनत करते रहे
पिता की दी सीख से हम मेहनती हुए
पिता का झोला कमोबेश अब हमारे हाथ है
पिता के छिले कंधे पर अब हम हाथ रखते हैं
अब पिता बचपन में लौट रहे हैं
कपड़े और जूते की फरमाइश करते हैं
खाने में नमक कम या ज़्यादा बताते हैं
कई गंभीर बातों को हँस कर टाल जाते हैं
यह पिता के बचपने की आरंभिक अवस्था है।
[ यह कविता इन्द्रप्रस्थ भारती पत्रिका में प्रकाशित है। ]