साहित्य आणि स्तर

साहित्य आणि स्तर

साहित्य आणि स्तर

ते म्हणतात की,
आजकाल तर सगळे लिहीत आहेत कविता
आजकाल तर कुणीही काहीही लिहीत आहे

ते ही बाब साहित्याकरिता 
चांगली मानत नाहीत-
ते आम्हा सर्वांना कदाचित
भाजीपाला साहित्यात गणत असावेत

माझे मत आहे की
ते भ्याले आहेत
कारण जेव्हा सगळे लोक लिहू लागतील तेव्हा लिहिल्या जातील त्या कवितादेखील- ज्यापासून ते दूर पळत असतात,
ऐकण्याची हिंमत राखत नाहीत

त्यांना साहित्य तोवर रूचकर 
वाटत होतं-
जोवर फक्त एक वर्ग लिहू शकत होता
आणि दूसरा पुस्तकसुद्धा मिळवू शकत नव्हता

त्यांचे म्हणणे आहे आता जास्तच लिहितायत लोक-
असे यासाठी की आता ते लोकसुद्धा
लिहिताहेत ज्यांच्या स्पर्शाने कलम अशुद्ध होत असत

त्यांचे मत आहे की
साहित्याचा स्तर घसरला आहे
कारण लिहित आहेत ते लोक
जे खालच्या स्तरात होते!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

वो कहते हैं कि
आजकल तो सब लिखते हैं कविता। 
आजकल तो कोई भी कुछ भी लिख देता है। 

वो इसे साहित्य के लिए 
अच्छा नहीं मानते-
वो हम सबको शायद 
सब्ज़ी साहित्य में रखते हैं। 

मेरा मानना है 
कि 
वो डरे हुए हैं कि 
जब सारे लोग लिखने लगेंगे 
तो लिखी जाएंगी वो 
कविताएँ भी- जिससे वो भागते हैं 
सुनने की हिम्मत नहीं रखते। 

उन्हें साहित्य तभी तक रुचिकर 
लगता था-
जब सिर्फ एक तबका लिख पाता था
और दूसरे को किताब भी न पाता था। 

उनका कहना अब ज्यादा ही लिखने लगे हैं 
लोग-
ऐसा इसलिए कि
अब वो लोग भी लिखने लगे हैं 
जिनके छूने से कलम अशुद्ध हो जाते थे। 

उनका कहना है कि
साहित्य का स्तर गिर सा गया है
क्योंकि लिखने लगे हैं लोग
जो गिरे हुए थे।। 

©किताबगंज
Kitabganj
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने