अमेरिकन लोकगायिका रियानो गिडन्सने (Rhiannon giddence) अमेरिकेतील निग्रोंच्या गुलामीचा इतिहास सखोलपणे वाचला आहे. 'इतिहास माझा सर्वात मोठा शिक्षक आहे' असे ती नेहमीच म्हणत असते.
Grammy सह जगभरातील अनेक प्रतिष्ठीत सन्मान तिने पटकावले आहेत. TED या प्रतिष्ठित व्याख्यानमालेवेळी ती म्हणाली होती, गाणे जीवनाला जिवंतता प्रदान करते'
Classical संगीताने प्रशिक्षीत असलेली गिडन्स 'कॅरोलिना चाॅकलेट ड्राप्स बॅन्ड'ची आघाडीची गायिका आणि गीतकार होती.व्हायोलीन आणि बँजो ही तिची आवडती वाद्ये आहेत.अमेरिकेच्या उभारणीत कृष्णवर्णियांचे योगदान या आपल्या अध्ययनविषयासंदर्भात संशोधनात तिला माहिती झाले की,
युरोपातून येऊन स्थायिक झालेल्या गोर्यांची सत्ता
स्थापित होण्यापूर्वीपर्यंत बँजो मूळात कृष्णवर्णीयांच्या लोकगीतांमधले आणि लोकनृत्यातले प्रमुख वाद्य होते,त्यामुळे तिने प्रत्युत्तरासाठीचे प्रतिक म्हणून बँजो ला आपले प्रिय वाद्य बनवले.गिडन्स अनवाणीच आपले कार्यक्रम सादर करत असते.'अनवाणी असणे आपल्याकरिता जमीनीशी जोडले जाणे असते,इतर कुठल्याही पध्दतीने असे जमीनीशी जोडलेली राहू शकत नाही'
आपल्या संवादामध्ये ती नेहमीच ती अशा पुस्तकांचे संदर्भ देत असते की जी पुस्तके अमेरिकेच्या वर्णभेदी विभाजन आणि दडपशाहीची प्रामाणिक दस्तऐवज मानली जातात. गिडन्सची अनेक लोकप्रिय गाणी याच ऐतिहासिक संदर्भांवर आधारीत आहेत.
ती सांगते,
'माझ्या विद्रोही संगीताचा स्वर हा उपदेशात्मक नाही.
मी श्रोत्यांशी बोलत नाही तर त्यांच्यापुढे सत्यकथन करते.अशा आवाजांना ऐकण्याचे माध्यम बनते की ज्यांना आमजनतेपर्यंत पोहोचू दिले गेले नाही. विद्रोही संगीताची ही अशी बाजू आहे की जी अनेकवेळा दुर्लक्षित,उपेक्षीत राहाते.'
रियानो गिडन्सने आपल्या संशोधनादरम्यान अठराव्या शतकातली एक वृत्तपत्रीय जाहीरात पाहिली,ज्यात लिहीले होते,
'विक्रीसाठी उपलब्ध आहे-एक अत्यंत स्मार्ट आणि सुदृढ निग्रो तरुणी (वेंचwench शब्द जो वेश्यावृत्तीच्या संदर्भात प्रामुख्याने वापरला जात असतो.) वय- सुमारे बावीस वर्षे,जिच्याकडून घरातली आणि शेतीची अशी दोन्ही कामे करुन घेतली जाऊ शकतात.तिचे नऊ महिन्याचे बाळ आहे ज्याला तिच्यापासून वेगळे ठेवले जाईल आणि खरेदीदाराच्या मर्जीनुसार त्याला कसेही आणि कुणालाही विकता येऊ शकेल.'
या जाहीरातीने रियानो गिडन्सवर प्रचंड प्रभाव टाकला,त्यातून अस्वस्थ होत तिने at the purcheser s option हे गाणे लिहीले जे freedom highway या अल्बममध्ये समाविष्ट आहे आणि ते अतिशय लोकप्रिय आहे.ती म्हणते,गुलामीच्या दिवसात पिडीत आपले अनुभव लिहू शकत नव्हते,नाहीतर मारले गेले असते.
ऐतिहासिक संदर्भांवर आधारीत मी एक काल्पनिक धडा तयार करण्याचा प्रयत्न करते,जर त्यांनी आपले म्हणणे
मांडले असते तर कसे मांडले असते.
at the puercher s option हे गीत त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.गुलामी कुटुंबाची कशी वाताहत करते हे त्यातून अतिशय समर्पकपणे सांगण्यात आले आहे.त्याच गाण्याचा हा भावानुवाद.
------
माझे एक छोटेसे बाळ आहे,
काय मी त्याला सोबत ठेऊ शकेन
एक दिवस असा येईल
जेव्हा रडून रडून मरुन जाईन
पण असे कसे होईल त्याच्यावर
मी प्रेम नाही करायचे आणि
त्या लहानग्याला छातीशीही
नाही धरायचे मी
तू माझे शरीर घे
तू माझी हाडे घे
तू घे माझे रक्तही
पण घेऊ शकणार नाहीस
कधी माझा आत्मा!
तू माझे शरीर घे
तू माझी हाडे घे
तू घे माझे रक्तही
पण घेऊ शकणार नाहीस
कधी माझा आत्मा!
माझे शरीर काळे आणि
चमकदार आहे
मीही तरुण होते पण फार दिवस
तशी राहू शकले नाही
तू मला बिछान्यावर खेचलेस
जेव्हा मी बालिका होते
आणि मग आणून सोडलेस
स्त्रियांच्या जगात
तू माझे शरीर घे
तू माझी हाडे घे
तू घे माझे रक्तही
पण घेऊ शकणार नाहीस
कधी माझा आत्मा
तू माझे शरीर घे
तू माझी हाडे घे
तू घे माझे रक्तही
पण घेऊ शकणार नाहीस
कधी माझा आत्मा
दरदिवशी मी कामाला जुंपून
घेतले
दरमिनीटाला ओव्हरटाईम
करत राहिले
चपळ बोटे सर सर चालायची
माझी रक्तबंबाळ बोटे
तुझ्या तिजोर्या भरत राहिल्या
तू घे माझे शरीर
तू घे माझी हाडे
तू घे माझे रक्तही
पण घेऊ शकणार नाहीस
कधी माझा आत्मा
तू घे माझे शरीर
तू घे माझी हाडे
तू घे माझे रक्तही
पण घेऊ शकणार नाहीस
कधी माझा आत्मा
माझे एक छोटेसे बाळ आहे,पण
काय त्याला मी सोबत ठेऊ शकेन?
------
मूळ इंग्रजी कविता
रियानो गिडन्स
हिंदी लेखन व अनुवाद
यादवेंद्र
Yadvendra
मराठी रुपांतर
भरत यादव
Bharat Yadav