आधी फाटली होती

आधी फाटली होती

आधी फाटली होती आता जळते आहे
खुनशी चड्डीगॅंग,आता पळते आहे

दीर्घकाळ कुणी मुर्ख बनवू नाही शकत
झोपलेली जनता,आता उठते आहे

धर्म आणि जातींचा दुहीसाठी वापर
तर ऐक्यासाठी,आता मूठ वळते आहे

मनुस्मृतीखोरांनी नुसता हैदोस मांडलेला 
संविधानाची खरी,किंमत आता कळते आहे

गंगाजमनी संस्कृतीचे वैरी पिसाळले
यांच्या कट्टरतेने ,हिंदमाता कळवळते आहे

                                          -भरत यादव
                                    Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने