स्मिता पाटील

स्मिता पाटील

स्मिता पाटील

तिच्या आत एक झरा होता
किती विचित्र गोष्ट आहे 
एक दिवस ती त्यात स्नान करीत होती
लोकांनी पाहिले,
बघूनही नाही बघितले तिच्या डोळ्यातले पाणी

मैनेने प्रयत्न केला
की कसे गायले जावे 
पिंजर्‍यातले गाणे
की लोकांना डोळ्यात पाहाण्याची सवय लागावी

तेव्हा घराच्यामागे वेणूवनात
वारे घोंघावत होते
जेव्हा तिने कोकिळची नक्कल केली होती 
आणि 
निघाली होती बगिचाकडे
आणि पाहिले की 
मोठाल्या वडाच्या झाडावर
कशाप्रकारे समाधी लावून बसलेली असतात गिधाडे
अवघ्या नगरसीमेचा थांग घेत 

मार खाणार्‍या,
लूटले जाणार्‍या
कुढत राहाणार्‍या बाईच्या रूपात शिव्या नव्हे,
मंत्र पुटपुटायची नयना जोगतीण

एक दिवस मी तिला विचारले
लहानपणी तू नक्कीच फेंदारीत असली पाहिजे नाक
ती हसून राहिली
मी म्हणालो
जिने गौतम बुद्धाला खाऊ 
घातली होती खीर
तुझ्यासारखीच असावी ती सुजाता

तिने विचारले
पुरूषाच्या तोंडाला लागलेली सिगारेट पुढे सरसावून शिलगावणारी मुलगीदेखील काय याप्रकारेच येऊ शकते इतिहासात?

कविताद्रोही सुद्धा मानीत होते
अभिनय करीत होती कविता
जीवनाच्या रंगमंचावर
गर्दीने तुडूंबलेल्या सिटी बसेसमध्ये

ऐकून होतो आम्ही बाळंतपणाच्या वेदनेनंतर बाई जन्म घेत असते दूसर्‍यांदा
हे अभिनेत्री!
आयुष्याच्या या शापित अभिनयासाठी आम्ही तयार 
नव्हतो गं!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

स्मिता पाटील

उसके भीतर एक झरना था
कितनी विचित्र बात है एक दिन वह उसमें नहा रही थी
लोगों ने देखा
देखकर भी नहीं देखा उसकी आंखों का पानी

मैना ने कोशिश की
कि कैसे गाया जाए पिंजरे का गीत
कि लोग आंखों में देखने के आदी हो जाएं

तब घर के पीछे बंसवारी में
हवा सांय-सांय करती थी
जब उसने कोयल की नक़ल की थी
और चल पड़ी थी बगीचे की ओर
कि देखा बड़े बरगद के पेड़ पर
किस तरह ध्यान लगाकर बैठते हैं गिद्ध
पूरे सीवान की थाह लेते हुए

पिटती-लुटती-कुढ़ती स्त्री के रूप में
गालियां नहीं
मंत्र बुदबुदाती थी नैना जोगिन

एक दिन मैंने उससे पूछा
बचपन में तुम ज़रूर सुड़कती रही होंगी नाक
वह मुस्कुराकर रह गयी
मैंने कहा
जिसने गौतम बुद्ध को खिलायी थी खीर
तुम जैसी ही रही होगी वह सुजाता

उसने पूछा
पुरुष के मुंह में लगी सिगरेट बढ़कर सुलगा देने वाली लड़की भी
क्या इसी तरह आ सकती है इतिहास में?

कविता द्रोही भी मानते थे
अभिनय करती थी कविता
जीवन के रंगमंच पर
भीड़ भरी सिटी बसों में

सुनते थे हम प्रसव की पीड़ा के बाद
औरत जनमती है दूसरी बार
अभिनेत्री!
जीवन के इस अभिशप्त अभिनय के लिए
हम तैयार नहीं थे

©दिनेश कुशवाह 
Dinesh Kushwah
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने