जजसाहेब!

जजसाहेब!

जजसाहेब,

आपणांस हे खुले पत्र लिहितो आहे कारण की हे पत्र देशातल्या जनतेनेही वाचावे अशी माझी इच्छा आहे.

माझे आईवडिल आणि चुलते या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले आहेत जसे त्यांच्या पिढीतले लाखो लोक लढले होते.

त्या सर्वांचे स्वप्न होते एका अशा भारताच्या निर्मितीचे 
ज्यात कुणावरही अन्याय होणार नाही, 
सर्वांना न्याय मिळेल.

आमच्या पिढीने आपल्या पूर्वजांच्या न्यायपूर्ण भारताच्या स्वप्नांच्या चिंधड्या उडताना पाहिले आहे.

या देशातली सरकारे 
मुस्लिमांच्या घरांवर
कुठल्याही कार्यवाहीविना बुलडोजर चालवितात पण कुठल्याही न्यायालयाला या अपमानाची जाणीव होत नाही की सरकार न्यायालयीन निर्णयाविना कुणालाही शिक्षा देऊ शकत नसतात,

जर सरकार असे करीत असतील तर हा न्यायालयाचा अवमान आहे.पण आपल्याला त्याचे वाईट वाटत नाही.

या देशात न्या.लोया यांची हत्या एक गुंड भाजप नेता आणि मंत्री करतो परंतू कुठल्याही न्यायाधिशाला संताप येत नाही,अखेर एखाद्या न्यायाधिशांचा खून केल्यानंतर तो गुंड तुरूंगात जाण्यावाचून कसा काय बचावला?

पण न्यायमुर्तींच्या हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्या गुंड मंत्र्यासोबत एक न्यायाधीशच जातो आणि नंतर बक्षिसी म्हणून वरच्या कोर्टात बढती मिळवून जज बनतो!

आदिवासी भागात सुरक्षा दले आदिवासी महिलांवर नियमितपणे बलात्कार करताहेत पण न्यायालये पूर्ण निर्लज्जपणे त्या महिलांच्या तक्रारींना उचलून कचर्‍याच्या कुंडीत फेकताहेत.

तुमच्या पाठबळामुळे बलात्कारी नराधम मिशांवर ताव देत नव्या महिलांवर बलात्कार करताहेत!

आदिवासी मुलं,बायका आणि ज्येष्ठांच्या हत्यांची एकूण ५१९ प्रकरणे मी कोर्टाकडे सोपविली आहेत परंतू दुर्दैवाने कुठल्याच प्रकरणी आपण न्याय नाही दिला.

या देशातील जनतेची सेवा करीत असलेल्या श्रेष्ठ बुद्धीमान देशप्रेमी सामाजिक कार्यकर्त्यांना तुरूंगात डांबण्यात आले आहे.

भीमाकोरेगाव प्रकरणी साडेचार वर्षे उलटूनही सरकार चार्ज शीट देखील फाईल करू शकलेले नाहीये.

करणार तरी कुठून? प्रकरणच पूर्ण बनावट आहे.

परंतू तुम्ही या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांना जामीन देत नाहीये आहात

जीएन साईबाबा आणि त्यांचे अन्य सहकारी यांच्याप्रकरणी न्यायाधिशांनी लिहिले होते, 'यांचा गुन्हा हा आहे की
या लोकांमुळे भारताचा विकास थांबतो आहे त्यामुळे मी यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावत आहे!'

आणि विकासाचा अर्थ आम्हा 
सर्वांना ठाऊक आहे!
आदिवासींची जंगले धनदांडग्या भांडवलदारांकडे सोपविणे हाच आपल्या दृष्टीकोनातून विकास आहे!

सामाजिक कार्यकर्त्या सोनी सोरी
यांच्या गुप्तांगात पोलिस ठाण्यामध्ये
दगड कोंबले गेले.

मेडिकल काॅलेजने त्यांच्या शरीरातून काढलेले ते दगड तुमच्या टेबलावर ठेवले पण तुम्ही अकरा वर्षानंतर न्यायाला धुडकावत त्यांची 
याचिकाच रद्द केलीत.

बिल्कीस बानोचे बलात्कारी 
आणि तिच्या मुलीचे मारेकरी यांना मुक्त करण्याच्या गुजरात सरकारच्या अमानवी निर्णयाला आपण योग्य ठरवलेत.

क्षमा करा, 
आपण न्यायालयाला न्याय नव्हे अन्याय करण्याच्या जागेत बदलून टाकलेत.

करोडो लोक एका राष्ट्राच्या रूपात सोबत राहाण्याचा निर्णय या भरवशावर घेत असतात की त्यांच्यावर कुणी अन्याय करू शकणार नाही.

पण आपण रोज अन्याय करणार्‍यांना साथ देत आहात,
आणि न्याय मागणार्‍यालाच गुन्हेगार ठरवीत चालला आहात.

जजसाहेब आपण न्यायालयाचा अवमान करीत आहात.

क्षमा करा आपण खूप दुबळे आणि भ्यालेले आहात

खरेतर आपणांस सरकारला भिण्याची अजिबात गरज नाहीये संविधानाने आपणांस सरकारपासून स्वतंत्र राखले आहे.

आपणांस पाहून मला त्या श्वानाची आठवण येते ज्याच्यापुढे कुणी काठी घेऊन उभा आहे आणि श्वानाने घाबरून आपले शेपूट आपल्या मागील पायांमध्ये दाबून ठेवलेय जणू

आमची अशी इच्छा आहे की आपणांस श्वानाचे पून्हा माणूस बनवावे

आपण केवळ न्यायाचा खून करीत नाही आहात तर आपण माणुसकी,लोकशाही,कायदा,
संविधान या सर्वांच्या हत्येस जबाबदार आहात.

आणि अखेरीस हे सांगू इच्छितो की हे पत्र मी आपला अवमान करण्यासाठी लिहिले आहे कारण मी जनतेवर अन्याय करणार्‍यांचा आदर करू शकत नाही.

आपला अवमान केल्याच्या आरोपाखाली कृपा करून मला तुरूंगात टाकण्याचा आदेश द्यावा,
जिथे माझी तशीच हत्या केली जाऊ शकेल जशी आपल्या सहकार्याने फादर स्टेन स्वामी आणि 
पांडू नरोटे यांच्या हत्या घडल्यात.

मला वाटते की भावी पिढीतल्या मुलांनी कमीतकमी मला एका माणसाच्या रूपात तरी स्मरावे जो अन्यायाच्या विरूद्ध बोलला आणि त्याने आपण माणूस असल्याचे कर्तव्य निभावले आणि 
तो मारला गेला!

भारताचा एक न्यायप्रिय नागरीक,

हिमांशु कुमार

मराठीकरण
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी टिपण

जज साहब

आपको यह खुला ख़त लिख रहा हूँ क्योंकि मैं चाहता हूँ कि इस ख़त को देश के लोग भी पढ़ें|

मेरे माता पिता और ताऊजी इस देश की आज़ादी की लड़ाई लड़े थे जैसे उनकी पीढ़ी के लाखों लोग लड़े |

उन सभी का सपना था एक ऐसे भारत का निर्माण जिसमें किसी के साथ अन्याय नहीं होगा सभी के साथ 
न्याय होगा |

हमारी इस पीढ़ी ने अपने पुरखों के न्याय युक्त भारत के सपनों की धज्जियां उड़ते हुए देखा है | 

इस देश में सरकारें मुसलमानों के घरों पर बिना किसी कार्यवाही के बुलडोज़र चला देती हैं लेकिन किसी अदालत को अपनी यह बेइज्ज़ती महसूस नहीं होती कि सरकार बिना अदालती फैसले के किसी को सज़ा नहीं दे सकती |

अगर सरकारें ऐसा कर रही हैं तो यह न्यायालय की अवमानना है | लेकिन आपको बुरा नहीं लगता |

इस देश में जज लोया की हत्या एक गुंडा भाजपा नेता और मंत्री कर देता है लेकिन किसी जज को कोई गुस्सा नहीं आता कि आखिर किसी जज की हत्या करने के बाद वह गुंडा जेल जाए बिना बच कैसे गया ?

लेकिन जज की हत्या के सबूत मिटाने उस गुंडे मंत्री के साथ एक जज ही जाता है और बाद में ईनाम के तौर पर ऊंची अदालत में प्रमोशन पाकर जज बन जाता है |

आदिवासी इलाकों में सुरक्षा बल आदिवासी महिलाओं से नियमित बलात्कार कर रहे हैं लेकिन अदालतें पूरी बेशर्मी से उन महिलाओं की शिकायतों को उठा कर कचरे के डब्बे में फेंक रही हैं |

आपके समर्थन से बलात्कारी मूछें मरोड़ते हुए नई महिलाओं से बलात्कार कर रहे हैं |

आदिवासी बच्चों, औरतों और बुजुर्गों की हत्याओं के 519 मामले मैंने कोर्ट को सौंपे हैं लेकिन अफ़सोस दर अफ़सोस किसी भी मामले में आपने इन्साफ 
नहीं दिया |

इस देश की जनता की सेवा करने वाले बेहतरीन बुद्धि वाले देशप्रेमी सामाजिक कार्यकर्ता जेलों में डाल दिए गये हैं |

भीमा कोरेगांव मामले में साढ़े चार साल बीतने के बाद भी सरकार चार्ज शीट तक फ़ाइल नहीं कर पाई है |

करेगी भी कहाँ से मामला ही पूरा फर्ज़ी है |

लेकिन आप इन बुज़ुर्ग सामाजिक कार्यकर्ताओं को ज़मानत नहीं दे रहे हैं |

जीएन साई बाबा और उनके अन्य साथियों वाले मामले के फैसले में जज ने लिखा था इनका अपराध यह है कि इन लोगों के करण भारत का विकास रुकता है इसलिए मैं इन्हें उम्र कैद देता हूँ |

और विकास का मतलब हम सबको पता है कि आदिवासियों के जंगल पूंजीपतियों को सौंपना ही आपकी नज़र में विकास है |

सोनी सोरी के गुप्तांगों में थाने के भीतर पत्थर भर 
दिए गये |

मेडिकल कालेज ने उसके शरीर से निकाले गये वो पत्थर आपकी टेबल पर रख दिए लेकिन आपने ग्यारह साल के बाद इन्साफ को ठोकर मारते हुए उसकी याचिका ही ख़ारिज कर दी |

बिलकीस बानों के बलात्कारियों और उसकी बेटी के हत्यारों को रिहा करने के गुजरात सरकार के अमानवीय फैसले को आपने जायज़ कहा|

माफ़ कीजिये आपने अदालत को न्याय नहीं अन्याय करने की जगह में बदल दिया है|

करोड़ों लोग एक राष्ट्र के रूप में एक साथ रहने का फैसला इस भरोसे पर करते हैं कि उनके साथ कोई अन्याय नहीं कर पायेगा |

लेकिन आप रोज़ अन्याय करने वालों का साथ दे रहे हैं और न्याय मांगने वालों को ही अपराधी घोषित 
कर रहे हैं |

जज साहब आप अदालत की अवमानना कर रहे हैं |

माफ़ कीजिये आप बहुत कमज़ोर और डरे हुए हैं |

हालांकि आपको सरकार से डरने की कोई ज़रूरत नहीं है संविधान ने आपको सरकार से आज़ाद रखा है |

आपको देख कर मुझे उस कुत्ते की याद आती है जिसके सामने कोई डंडा लेकर खड़ा हो और कुत्ते ने डर कर अपनी पूँछ अपनी पिछली टांगों के बीच में दबा रखी हो |

हम चाहते हैं आपको कुत्ते से फिर इंसान बना दें |

आप ना सिर्फ इन्साफ का क़त्ल कर रहे हैं बल्कि आप इंसानियत लोकतंत्र कानून

संविधान सबके क़त्ल के ज़िम्मेदार हैं |

और अंत में यह बताना चाहता हूँ कि यह खत मैंने आपकी अवमानना करने के लिए लिखा है क्योंकि मैं जनता के साथ अन्याय करने वालों की इज्ज़त नहीं कर सकता

आपकी अवमानना के इलज़ाम में कृपया मुझे जेल में डालने का हुकुम दीजिये जहां मेरी वैसे ही हत्या की जा सके जैसे आपके सहयोग से फादर स्टेन स्वामी और पांडु नरोटे की हत्या हुई |

मैं चाहता हूँ कि आने वाले बच्चे कम से कम मुझे एक ऐसे इंसान के रूप में याद करें जो नाइंसाफी के खिलाफ बोला और अपने इंसान होने का फ़र्ज़ निभाया और मारा गया |

भारत का एक न्यायप्रिय नागरिक,

©हिमांशु कुमार
Himanshu Kumar
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने