रांड

रांड

रांड

रांड 
या शतकातला
सर्वात जास्त वेळा बोलला गेलेला शब्द आहे.

शाब्दिक अर्थ ज्ञात होत नसतानाही
एखाद्या शब्दाचा 
अनंतवेळा 
उच्चार होणे
म्हणजे एकतर ती शिवी असू शकते
किंवा मग मंत्रोच्चार.

परीपाठाच्या विध्वंसातून निघालेला ध्वनी संगीत असते
जणू काही प्रत्येक वेदनेच्या दूसर्‍या टोकावर प्रतिक्षेत 
उभा असतो 
अनहद नाद.

रांड हा
केवळ शब्द नाहीये
शतकानुशतके गदागदा गड हलवल्यानंतर
जन्मलेला
कर्कश्श कोलाहल आहे
चित्कार आहे
चीड आहे
आरडाओरड आहे.

होय
वेदना आहे ही
स्त्रीला देहापुरती मर्यादीत करणारी
आणि अमर्याद स्त्री
वेदनेच्या दूसर्‍या टोकावर आहे.

तुटत्या, फुटत्या, कोसळत्या,
उद्धवस्त होत चाललेल्या परीपाठाच्या ढिगार्‍याखाली 
दबलेला पुरूष
विव्हळतो आहे 
विव्हळतोय आणि 
ओरडतोय
तू रांड आहेस.

पुरूषाच्या ओसरत 
चाललेल्या
करिश्म्यात
काचेच्या ओरखड्यासारखी
थरथर आहे
स्त्री या थरथरीने आता
थरकापत नाही
फक्त डोळ्यात डोळा घालून सांगते आहे की,
हे पुरूषा
हा आजोरा
तुझी शतकानुशतकांची कमाई आहे
आधी याच्या इमारतीवर 
बसला होतास
आता आजोर्‍यात आहेस.

पुरूष भुवया विस्फारतोय
स्त्री पुढे पुढे सरसावतेय
दूरपर्यंत आजोर्‍यात दबलेल्या पुरूषाचा 
आवाज पाठलाग करतोय
तू रांड आहे,
रांड आहेस तू
रांड शब्द आता 
स्त्रीच्या आत आत वाजतोय
प्रतिकार नाही करत.

युगायुगाच्या मंत्रोच्चारानंतर
निपजलेला अद्वितीय शब्द 
आहे रांड
ज्याने जितका बाहेर कोसळवला आहे
तितके आतमध्येही कोसळवले आहेत गड.

कमालीचा आहे हा एक शब्द
शास्त्र शिकलेल्या देशाला नागवे करण्यास पुरेसा आहे
पुरूष याचा उच्चार करतो
थरथरायला लागतो
स्त्री हा उच्चार ऐकते 
देहरूपी भ्रमजाल भेदायला लागते.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

रंडी

रंडी
इस सदी का
सबसे ज्यादा बार बोला गया शब्द है

शाब्दिक अर्थ ज्ञात ना होते हुए भी
किसी शब्द का अनंत बार बोला जाना
या तो गाली होता है
या फिर मंत्रोच्चार

परिपाटियों के ध्वंस से निकली ध्वनियां
संगीत होती हैं
जैसे हर  दर्द के दूसरे मुहाने पर 
इंतजार में खड़ा होता है अनहद नाद

रंडी 
शब्द  नही है मात्र
सदियों के दुर्ग हिलाने पर उपजा 
कर्कश शोर है
चीत्कार है
चीख है
खीझ है
चिल्लाहट है

हां 
दर्द है ये
देह में स्त्री को सीमित करता
और असीमित स्त्री
दर्द के दूसरे मुहाने पर है

टूटती गिरती ध्वस्त होती परिपाटियों के मलबे नीचे दबा पुरुष कराहता है
कराहता है और चीखता है
तू रंडी है

पुरूष के टूटते तिलिस्मो में
कांच के क्रीच सी सिरहन है
स्त्री इस सिरहन से अब
कांपती नही है 
सिर्फ आंख में आंख डाल बताती है
कि ये मलबा
तुम्हारी सदियों की कमाई है पुरूष
पहले इसकी इमारत पर बैठे थे
अब मलबे में हो

पुरुष त्यौरियां चढ़ाता है
स्त्री आगे बढ़ जाती है
दूर तक मलबे में दबे पुरुष की आवाजें पीछा करती हैं
तू रंडी है
रंडी है तू
रंडी शब्द अब स्त्री के भीतर बजता है
प्रतिकार नही करता

युगों के मंत्रोच्चारों के बाद उपजा
अद्वितीय शब्द है रंडी
जिसने जितना बाहर गिराया है
उतने भीतर भी गिराये हैं दुर्ग

कमाल का यह एक  शब्द 
शास्त्र पढ़े मुल्क को नंगा करने को काफी है
पुरुष इसे उच्चारता है 
कांपने लगता है
स्त्री इसे सुनती है
देह के भंवरजाल को भेदने लगती है।

©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia 

Painting by 
इरा टाक
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने