बेटा,
समाज तुझ्याबद्दल काहीबाही
बोलतो आहे.
थोडा विचार करायला हवा आपण.
काय बोललं जातंय पप्पा?
तुला ठाऊक नाहीये का?
मी समाजाचं बोलणं आता मनावर घेत नसतो पप्पा,
तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास झाला असेल तर कृपा करून सांगा मला.
बेटा,
स्वतःपेक्षा बारा वर्षांनी मोठी असलेल्या बाईबरोबरच्या तुझ्या अफेयर वर समाज वाट्टेल तसे
बोलतो आहे.
मग बाईने किती वर्षांनी मोठे असले पाहिजे पप्पा?
मुलाने एक परिपक्व प्रश्न विचारला.
हा कसला विचित्र प्रश्न?
पप्पा,समाज जेव्हा प्रश्न विचारत असतो,तेव्हा आपण काय फक्त उत्तरेच देत बसायचे का?
प्रश्नसुद्धा विचारू शकतो ना?
बेटा,
समाज तर नंतर आहे,
माझा स्वतःचा त्या नात्यावर
आक्षेप आहे.
मग पप्पा,
तुम्ही थेटदेखील विचारू शकले
असता ना.
पित्याच्या अधिकाराचा आपण कधीही वापर करू शकता,
समाजाच्या आडून विचारायची गरज का पडावी?
ठिक आहे,
थेटच सांगतो,
माझा या नात्यावर आक्षेप आहे.
मुलगा गप्प बसला.
वडिलांनीही मौन धारण केले.
मुलगा मग थोड्या संयमानेच बोलला,
पप्पा,जर तुम्ही वाईट वाटून घेणार नसाल तर मुलगा म्हणून असलेल्या अधिकाराचा मीही वापर करू
शकतो का?
बोल.
पप्पा,
तुम्हीदेखील स्वतःपेक्षा दहा वर्षे वयाने लहान असलेल्या महिलेबरोबर लग्न केलेय,आणि ते तुमचे दूसरे लग्न होते.
वडिलांचा चेहरा कठोर झाला.
पण त्यांनी कठोरतेला दाबत संयमाने उत्तर दिले,
'तिला माझी गरज होती,बेटा
सगळ्या जगाला माहित आहे हे.'
माझ्या आईला कॅन्सर होता पप्पा,
तिलाही तुमची गरज होती,
तुम्ही पैसे पाठवले पण
तुम्ही स्वतः नाही आलात.
समाजाला दाखविण्यासाठी तुम्ही फक्त अंतिम संस्काराला आलात.
आई गेल्यानंतर मला आईची प्रचंड उणीव भासली पप्पा,
माझ्या ठिकाणी
तुम्ही असता तर कदाचित तुम्हाला कळले असते.
वडिल गप्प राहिले पण कठोरता वाढत चालली.
माझ्यापेक्षा वयाने मोठी प्रेयसी आहे ना पप्पा,
ती कधी माझी आईसुद्धा बनत असते.
मी अनेकदा जेव्हा कोसळून पडतो,विस्कटून जायला लागतो तेव्हा ती मला विस्कटू देत नाही.
समाजाला वाटते की बाई ही पुरूषाहून लहान असली पाहिजे कारण स्त्री तर शरीर आहे.मी बाईला बाई मानतो पप्पा,आणि वय म्हणजे तर काय निव्वळ आकडेच की!
ज्याप्रमाणे प्रेमाला कुठले वय असत नाही
त्याचप्रमाणे बाई किंवा
स्त्रीलाही कुठले वय असत नाही पप्पा,
बाईची प्रतिष्ठा असते.
मी सेकंदभरसुद्धा
mom च्या अब्रू-प्रतिष्ठेवर कधी आघात केलेला नाहीये.
आपणांकडून पण हीच अपेक्षा
आहे पप्पा.
वडिलांचे डोळे भरून आले,
बेटा,आज तू माझ्याहून आणि समाजाहूनही मोठा झालास.
I am proud of you बेटा.
बाईचे खरोखरच कुठले
विशिष्ट असे वय नसते.
तिची प्रतिष्ठा,इज्जत असते!
वेल सेड बेटा.
आणि वडिलांनी पुढे येऊन मुलाची गळाभेट घेतली.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी लघुकथा
औरत की कोई उम्र नही होती
बेटा,
समाज तुम्हारे बारे में अनेक बातें कर रहा है।
थोड़ा सोचना चाहिए हमें।
क्या बातें कर रहा है पापा?
तुम क्या जानते नही बेटा?
मैं समाज की बातों पर अब कान नही धरता पापा,
आपको किसी बात ने परेशान किया हो तो बताएं प्लीज।
बेटा, अपने से 12 साल बड़ी औरत के साथ तुम्हारे अफेयर पर समाज अनेक बातें कर रहा है।
तो औरत कितने साल बड़ी होनी चाहिये पापा। बेटे ने एक परिपक्व सवाल पूछा।
ये क्या अजीब सवाल है ।
पापा, समाज जब सवाल करता है, तब हम क्या जवाब ही देँगे। सवाल भी तो कर सकते हैं न।
बेटा, समाज तो बाद में है, मुझे खुद उस रिश्ते पर आपत्ति है।
तो पापा, आप सीधे भी तो कह सकते थे। पिता वाला यह अधिकार तो आप कभी भी प्रयोग कर सकते हैं। समाज की आड़ लेने की क्या जरूरत पड़ी।
ठीक है, सीधे कह देता हूँ, मुझे इस रिश्ते से आपत्ति है।
बेटा चुप रहा।
पिता ने भी खामोशी ओढ़ ली
बेटा फिर थोड़ा संयत होकर बोला-, पापा, आप अगर बुरा न मानें तो एक बेटे वाला अधिकार मैं भी प्रयोग कर लूं?।
कहो।
पापा, आपने भी तो अपनी उम्र से दस साल छोटी महिला से शादी की। और वह आपकी दूसरी शादी थी।
पिता का चेहरा कठोर हो गया। लेकिन उसने कठोरता को दबाते हुए संयत जवाब दिया- उसे मेरी जरूरत थी बेटा, सारी दुनिया जानती है।
मेरी माँ को कैंसर था पापा, उसे भी आपकी जरूरत थी। आप ने पैसे भिजवा दिए लेकिन आप नही आये। समाज को दिखाने आप सिर्फ अंत्येष्टि में आये। मां के जाने के बाद मुझे मां की कमी बहुत खली पापा। आप होते तो शायद आप समझते।
पिता चुप रहा लेकिन चेहरे पर कठोरता बढने लगी।
मुझसे बड़ी उम्र की प्रेमिका है न पापा, वह कभी मेरी माँ भी हो जाती है। मैं बहुत बार जब टूट कर बिखरने लगता हूं तो वह मुझे बिखरने नही देती। समाज को लगता है कि औरत पुरुष से छोटी होनी चाहिए क्योंकि औरत तो जिस्म है। मैं औरत को औरत मानता हूं पापा। और उम्र तो सिर्फ नंबर है। जिस तरह प्रेम की कोई उम्र नही होती उसी तरह औरत की भी कोई उम्र नही होती पापा, औरत की डिग्निटी होती है। मैंने सेकंड mom की डिग्निटी पर कभी चोट नही की। आपसे भी यही उम्मीद है पापा।
पिता की आंख भर आई, बेटा, तुम आज मुझसे और समाज से बड़े हो गए। । आई एम प्राउड ऑफ यू । औरत की वाकई कोई उम्र नही होती। उसकी डिग्निटी होती है। वैल सैड बेटा।
और पिता ने आगे बढ़कर बेटे को गले लगा लिया।
©वीरेंदर भाटिया
virendar bhatia