कविता

कविता

कविता

त्यांनी आपल्या नांगराने
शेत-शिवारात कविता लिहिल्या
ज्या आम्ही वाचू शकलो नाही

कारखान्यांमध्ये, खाणींमध्ये
मशिनरी अवजारे यांच्या लयीवर
कामगारांनी अनेक प्रेमगीते गायिली
ज्यांवर आम्ही थिरकलो नाही

प्रेयसीने बोटाच्या पेराने
तळहातावर लिहिली जी कविता
तिचे स्पंदन आम्हांला जाणवले नाही

कितीतरी कविता
डोळे आणि स्पर्शाने 
प्राजक्त फुलासारख्या
टपकत राहातात आणि 
कोमेजून जातात

फुले खुडणार्‍या,महूवा वेचणार्‍या
दळण दळणार्‍या,केस सुकवणार्‍या
स्त्रियांनी रचली आणि गुणगुणलीत
कितीक कवणं,
जी आम्ही कधी ऐकू नाही शकलो

शब्द नव्हते तेव्हाही,
आदिम पुरूष
नदीघाटावरील पाषाणांवर
कोरत राहिले
आडव्या-तिडव्या रेषांनी आपल्या
काळातली कविता

कविता होत्या त्यांच्याजवळ अगणित
आमच्याकडे त्यांना वाचण्याचे, 
समजून घेण्याचे सामर्थ्य नव्हते

आम्ही केवळ स्वतःलाच 
कवी मानत राहिलो!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

कविता 

उन्होंने अपने हल से
खेतों में कविताएं लिखीं
जिन्हें हम पढ़ नहीं सके

कारखानों खदानों में
मशीनों औजारों की लय पर
कामगारों ने कई प्रेमगीत गाये
जिन पर हम नहीं झूमे

प्रिया ने उंगली की पोर से
हथेली पर लिखी जो कविता
उसका स्पंदन हमें महसूस नहीं हुआ

कितनी ही कविताएं 
आंखों और स्पर्श से हरसिंगार सी झरती हैं
और कुम्हला जाती हैं

फूल तोड़तीं , महुआ बीनतीं
आटा पीसतीं , बाल सुखातीं स्त्रियों ने 
रचीं और गुनगुनाईं कितनी कविताएं 
जिन्हें हम कभी सुन नहीं पाए 

शब्द नहीं थे तब भी 
आदिपुरुष 
नदी घाटी की शिलाओं पर उकेरते रहे 
आड़ी तिरछी रेखाओं से अपने समय की कविता

कविताएं थीं उनके पास अनेकों
हमें उन्हें पढ़ने समझने की सामर्थ्य नहीं थी

हम सिर्फ अपने को कवि मानते रहे !

©राजहंस सेठ
Rajhans Seth 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने