युद्धग्रस्त क्षेत्रात
स्फोटाच्या गदारोळात
घूमतो आहे एका
नवजात शिशुचा हर्षध्वनी,
पडत-धडपडत-उठत काही मुलं
शिकताहेत सायकल चालवायला,
जरा दूरवर एक पोक्त मनुष्य
लावतो आहे आंब्याचे रोपटे
आणि
कुणी प्रेमवीर
लिहितो आहे
आपल्या प्रेयसीच्या नावे
एखादी प्रेमकविता.
या दृष्याच्या मधोमध उभा
मी विचार करतो आहे
खरेच,
त्या नवजात शिशुच्या हर्षध्वनीने
उद्धवस्त होऊन जावेत सगळ्या
हुकूमशहांच्या किल्ल्यांचे बुरूज,
त्या मुलांच्या सायकलीखाली
चिरडली जावीत सारी
लढाऊ विमाने आणि रणगाडे,
हिसकावून सर्वांच्या हातातून बंदूका
त्यांना गाडून टाकले जावे
त्या आंब्याच्या रोपट्याच्या चहूबाजूला
खड्डे खणून आणि
युद्धक्षेत्राच्या मधोमध
फडकवली जावी त्या प्रेमवीराची
ती प्रेमकविता एखाद्या विजयध्वजाप्रमाणे.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
युद्ध ग्रसित क्षेत्र में
धमाकों के बीच
गूँज रही है एक नवजात की किलकारी
गिरते-पड़ते हुए कुछ बच्चे
सिख रहे हैं चलाना साइकिल
थोड़ी दूर एक बुजुर्ग लगा रहा है आम का पौधा
और एक प्रेमी लिख रहा है
अपनी प्रेमिका के नाम कोई प्रेम कविता
इस दृश्य के मध्य खड़ा मैं सोचता हूँ
काश!
उस नवजात की किलकारी की गूँज से ध्वस्त हो जाए
सभी तानाशाहों के किलों की दीवारें
उन बच्चों की साइकिल के नीचे
रौंद दिये जाए सभी लड़ाकू जहाज और टैंक
छीन कर सबके हाथों से बंदूकें
उन्हें गाड़ दिया जाए
उस आम के पौधे के चारों तरफ बाड़ बना कर
और युद्ध क्षेत्र के बीचों-बीच
लहरा दी जाए उस प्रेमी की वो प्रेम कविता
किसी विजय पताका की तरह।
©हेमन्त परिहार
Hemant Parihar