कामाच्या कोळीजाळ्यापासून वाचण्यासाठी
पुरूषपणाच्या फटीत लपून राहिलेत पुरूष
वेळेमधून वेळ वाचविण्यासाठी
आणि ती जळतेय शुष्क गवतासारखी
प्रत्येक दिवशी दुष्काळ
जणू माळरानावरचा
ती पक्व गव्हासारखी दळली जाते
समाज आणि स्वाभिमानाच्या
पाट्याच्या चक्कीत
आपल्या बाईपणाला धर्म मानून.
आणि ऐदी पौरूष
स्त्रीत्वाच्या चूकांवर
आपले पुरूषत्व
लाठ्यांवरती तोलताना
सिद्ध करीत असतो निर्लज्जपणा
अरे पुरूषांनो,
बाईच्या वाट्याचा रविवार कुठे आहे?
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
सत्यव्रत रजक